12:36pm | Oct 13, 2022 |
पर्थ : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियातील आपल्या मिशन टी-२० वर्ल्डकपची शानदार सुरुवात केली आहे. पहिल्या अनऑफिशियल सराव सामन्यात त्यांनी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा १३ धावांनी पराभव केला. आता या संघाविरुद्ध दुसरा अनऑफिशियल सराव सामना खेळवला जात आहे. हा सामनाही पर्थमध्येच होत आहे. या सामन्यात टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करणार आहे. या सलग दुसऱ्या सराव सामन्यात विराट कोहलीला स्थान मिळालेले नाही. तर पहिल्या सामन्यातून बाहेर पडलेल्या केएल राहुलला या सामन्यात कर्णधारपद मिळाले आहे. रोहित शर्मा देखील संघात खेळत आहे.
यानंतर भारतीय संघाला दोन ऑफिशिअल सराव सामनेही खेळायचे आहेत. हे सामने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध अनुक्रमे १७ आणि १९ ऑक्टोबरला होणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया २३ ऑक्टोबरला विश्वचषकातील पहिला सामना खेळणार आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी हा सामना पाकिस्तानविरुद्ध मेलबर्न येथे होणार आहे.
सराव सामन्यात भारताचा अंतिम अकरा संघ
रोहित शर्मा, केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग.
कोहली-राहुल-अश्विन पहिला सामना खेळले नाहीत
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला पहिल्या अनऑफिशियल सराव सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये खेळायला दिले गेले नाही. कोहलीशिवाय सलामीवीर केएल राहुल आणि स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनही संघात नव्हते. मात्र या दुसऱ्या अनऑफिशियल सराव सामन्यात राहुल आणि अश्विनचे पुनरागमन झाले आहे.
टीम इंडियाने पर्थमध्येच वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला अनऑफिशियल सराव सामना खेळला. त्या सामन्यात ऋषभ पंतने कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीवीर हि भूमिका बजावली. या सामन्यात सूर्यकुमार यादवने ३५ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ५२ धावा केल्या. यामुळे भारतीय संघाने ६ बाद १५८ धावा केल्या. १५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला ८ गडी गमावून केवळ १४५ धावा करता आल्या आणि भारताने १३ धावांनी सामना जिंकला. या सामन्यात टीम इंडियाकडून अर्शदीप सिंगने ३ बळी घेतले, तर भुवनेश्वर कुमारने २, हर्षल पटेलला १ आणि युजवेंद्र चहलला १ बळी मिळाला.
छत्रपती शिवाजी कॉलेजची एन सी सी कॅडेट गार्गी थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना |
भा ज पा सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न |
साताऱ्यासह पश्चिम भागात पाऊस |
आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्या वाचवा! |
कोंडवे येथील एका शाळकरी मुलाची आत्महत्या |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
एमडीआरटी सल्लागारांच्या क्रमवारीत टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी |
महालक्ष्मीच्या आरतीसाठी सोळा दिवे आणि 56 भोग |
बेडग ते मंत्रालय लॉंग मार्च आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी साताऱ्यात मान्यवरांची भेट |
व्यवहारातील संवेदना समजावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवे |
बेडग येथील कमान प्रकरणाचा रिपाईद्वारे साखळी मोर्चा काढून निषेध |