पुसेगाव: सद्यस्थितीत, पुसेगावसह परिसरात कोरोना संसर्गाने उसळी घेतल्याने पुसेगाव कोविड सेंटर हाऊसफुल झाले आहे. त्यामुळे, अनेक कोरोनाबाधित रुग्णांना उपचार घेण्यात अडचणी येत आहेत. येथील रुग्णांना बेड मिळविण्यासाठी इतरत्र भटकावे लागू नये, त्यांच्यावर वेळेत उपचार व्हावेत व कोरोना संसर्गाला आळा बसावा यासाठी 30 बेडचे कोविड आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, पुसेगावसह परिसरातील कोणताही रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नये म्हणून हे सेंटर होणे आवश्यक होते.
पुसेगावसह परिसरातील प्रत्येक नागरिकाला तात्काळ रुग्णसेवा मिळावी यासाठी पुसेगाव ग्रामस्तरीय समिती व नागरिकांच्या सहकार्याने गावातील शासकीय विद्या निकेतनच्या इमारतीत हे आयसोलेशन सेंटर उभारण्यात आले आहे. या ठिकाणी कोरोना संदर्भात लक्षणे आढळणार्या नागरिकांसाठी तातडीने उपचार घेणे सोयीचे होणार आहे. तसेच कोविड पॉझिटिव्ह असलेल्या पण बेड न मिळालेल्या आणि आयसोलेशनची गरज असलेल्या रुग्णांना येथे ठेवण्यात येणार आहे. या सेंटरमध्ये कोरोना रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घेतली जाणार असून पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर मॉनिटरिंग करणार आहेत.
दरम्यान, करोनाच्या महामारीशी लढत असताना नागरिकांनी कोरोनाबद्दल संवेदनशील राहणं आवश्यक आहे. अनेक रुग्ण सुरुवातीला घरगुती उपचार करताना तसेच बाजारपेठेत फिरताना दिसून येत आहेत. मात्र, तसे न करता नागरिकांनी वेळेतच कोविड आयसोलेशन सेंटरला भेट देऊन योग्य ते उपचार घ्यावेत, असे आवाहन सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व ग्रामपंचायत सदस्य रणधीरशेठ जाधव यांनी केले.
सद्यस्थितीत होम आयसोलेशन मध्ये असलेले अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण घराबाहेर फिरत असल्याने कोरोना संसर्ग बळावत आहे. जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असतील किंवा ज्यांना कोरोनाची लक्षणे असतील अशा नागरिकांनी आयसोलेशन सेंटरला तात्काळ भेट देऊन आयसोलेट व्हावे.
-गणेश बोबडे, तलाठी, पुसेगाव
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |