11:35am | Aug 24, 2021 |
पुसेगाव : वातावरणात बदल झाल्याने डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे. पावसाळ्यात डासांचे प्रमाण वाढल्याने त्रास होवून ताप येवून रुग्ण संख्येत वाढ होत आहे. या काळात डेंग्यू, चिकन गुनिया व मलेरिया सारखे आजार डासांमुळे उदभवतात व पसरतात. काहीही करुन या काळात डास पळाले पाहिजेत, यासाठी अनेक उपाययोजना लोकांमधून होत असल्याचे दिसून येत आहे.
या काळात आजारांपासून लांब राहण्यासाठी चांगला पर्याय म्हणजे डासांना घरात येवू न देणे. काँइल, मँट, रिपेलेंटस किंवा लिक्विड आदींचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय.यातून निघणार्या विषारी धुरामुळे अनेकांना श्वसनाचे विकार सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. तुळस, पुदिना,झेंडू आदी आपल्या अंगणात लावल्यास डासांपासून मुक्ती मिळते, असे जाणकारांचे मत आहे. खोबरेल तेल व कडूनिंबाचे तेल एकत्र करून लावल्यास डासांपासून संभाव्य होणारे आजार टाळता येतात.लिंबाचं आणि निलगिरी तेलाचे मिश्रण अंगावर लावल्यास त्याचा शरीरावर परिणाम होवून निरोगी शरीर राहते. कापूर जाळल्याने जास्त फायदा होतो.तसेच कडूनिंबाचे तेल व कापूर यांचे मिश्रण करून स्प्रे रात्री झोपण्यापूर्वी घरभर फवारल्यास डास घरातून पळून जातील.लसणाच्या पाकळ्या पाण्यात टाकून चांगल्या उकळल्यावर हे पाणी घरात शिंपडल्यास लसणाच्या तिखट वासाने घरात डास थांबत नाहीत. सरसोच्या तेलात ओव्याचे पुड मिसळून दिवा लावल्यास डास दूर पळतात. सध्या कश्याप्रकारे चे घरगुती उपाय घरोघरी सुरू झाले आहेत.
कडूनिंब, झेंडू, सिद्रोनला ग्रास, ओडोमास ट्री, पेटुनिया, लेव्हेंडर, लेमन ग्रास, रोजमेरी, तुळस या वनस्पतींना विशिष्ट प्रकारचा वास असतो.तो वास डासांना आवडतं नसल्याने या वनस्पतींच्या परिसरात डास फिरकत नाहीत. या वनस्पतींच्या पानांचा योग्य वापर केल्यास डेंग्यू, मलेरिया सारखे मच्छर येवू शकत नाहीत.या वनस्पती आपण अंगणात अथवा बाल्कनीत लावू शकतो. त्यामुळे यइतर उपायांपेक्षा या घरगुती कमी खर्च आणि आरोग्यदायी उपचाराला प्राधान्य क्रम दिला जात असल्याचे सदृश्य चित्र पहावयास मिळत आहे. या कारणाने या रोपांची लागवडीचे प्रमाण प्रामुख्याने वाढले आहे.
वास्तविक पाहता डास हे साचलेल्या गोड्या पाण्यावरच तयार होत असतात. निसर्गालाही हानीकारक ठरत असलेल्या 'वापरा आणि फेका' (युज अँन्ड थ्रो) या ग्लासांमुळे डासांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. काही वनस्पतींच्या पानांचा, तेलांचा अथवा सुगंधाचा वापर झाल्यास डास मानवाजवळ येत नाहीत. यामध्ये प्रामुख्याने तुळस, कडूनिंब, निरगुडी, झेंडूसह आदी वनस्पतींची लागवड आरोग्याला पोषक वातावरण तयार करते. तसेच गप्पी मासे यांचे प्रमुख अन्न डासांची अंडी असल्याने त्या डासांची उत्पत्ती होत नाही. वनस्पतीसह गप्पी मासे या डासांवर तात्पुरते उपाय आहेत.
-- प्रा.सोहन मोहळकर (वनस्पतीशास्त्र)
घरच्या ओला कचरा वेगळा करुन त्यापासून चांगल्या प्रतीचे खत तयार करता येते. त्याचा उपयोग गच्चीवरील बाग व परसबागेतील औषधी वनस्पती साठी केला जाऊ शकतो. प्रत्येक कुटुंबाने किमान पाच औषधी (तुळस पुदीना गवति चहा गुळवेल शतावरी निर्गुडी खाऊचे पान इ.) वनस्पती लावाव्यात.
-- डाँ.कुंडलीक मांडवे (अध्यक्ष, प्रयास सामाजिक संस्था, वडूज)
छत्रपती शिवाजी कॉलेजची एन सी सी कॅडेट गार्गी थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना |
भा ज पा सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न |
साताऱ्यासह पश्चिम भागात पाऊस |
आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्या वाचवा! |
कोंडवे येथील एका शाळकरी मुलाची आत्महत्या |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
एमडीआरटी सल्लागारांच्या क्रमवारीत टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी |
महालक्ष्मीच्या आरतीसाठी सोळा दिवे आणि 56 भोग |
बेडग ते मंत्रालय लॉंग मार्च आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी साताऱ्यात मान्यवरांची भेट |
व्यवहारातील संवेदना समजावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवे |
बेडग येथील कमान प्रकरणाचा रिपाईद्वारे साखळी मोर्चा काढून निषेध |