10:59pm | Aug 08, 2020 |
सातारा : शनिवारी दिवसभरात आठजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 263 नवीन कोरोनाबाधित निष्पन्न झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5641 वर पोहोचला आहे, तर जिल्ह्यातील विविध रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 122 नागरिक कोरोनातून ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज दिला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
दरम्यान, शनिवारी घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावळी तालुक्यातील 15, कराड तालुक्यातील 74, खटाव तालुक्यातील 1, कोरेगाव तालुक्यातील 1, माण तालुक्यातील 2, पाटण तालुक्यातील 7, सातारा तालुक्यातील 17, वाई तालुक्यातील 5 नागरिकांचा समावेश आहे.
465 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 45, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 9, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 43, कोरेगांव 15, वाई येथील 38, शिरवळ-खंडाळा येथील 78, रायगाव येथील 11, पानमळेवाडी येथील 36, मायणी येथील 20, महाबळेश्वर येथील 14, पाटण येथील 19, खावली येथील 30, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 107 असे एकूण 465 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असून पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.
8 कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू
सातारा येथील खाजगी रुग्णालयात फडतरवाडी (नेर) ता. खटाव येथील 74 वर्षीय पुरुष, क्रांतीतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे कोडोली ता. सातारा येथील 86 वर्षीय पुरुष, जकातवाडी ता. सातारा 48 वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील घारळेवाडी येथील 65 वर्षीय महिला, व शामगाव ता. कराड येथील 72 वर्षीय महिला यांचा तसेच मंगळवार पेठ, कराड येथील 84 वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात, रामदास कॉलनी फलटण येथील 74 वर्षीय पुरुष, वाघोशी ता. खंडाळा येथील 60 वर्षीय पुरुष अशा आठ कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |