02:37pm | Jun 15, 2022 |
नवी दिल्ली : रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर करताना भारतीय जनता पार्टीने धक्कातंत्राचा वापर केला होता. आताही अन्य नावे चर्चेत असली तरी प्रत्यक्षात वेगळ्याच व्यक्तीच्या गळ्यात ही माळ पडेल असे मानले जाते आहे. त्याहुन देशाचे आगामी राष्ट्रपती हे मुस्लिम समुदायातून आले असण्याची दाट शक्यता असल्याचा अंदाजही काही वाहिन्यांनी सूत्रांच्या हवाल्याने वर्तवला आहे. आरिफ मोहम्मद खान यांच्याही नावाची चर्चा आहे. ते सध्या केरळचे राज्यपाल आहेत आणि पुरोगामी मुस्लीम नेते अशी त्यांची ओळख आहे. देशात आणि जगभरात पुरोगामित्वाचा संदेश देण्यासाठी भाजप आरिफ मोहम्मद खान यांची निवड करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या राष्ट्रपती निवडणुकीवेळी म्हणजेच 2017 साली रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर करून भाजपने सर्वांनाच धक्का दिला होता. त्यापूर्वी कुठेही कोविंद यांचे नाव कोणाच्या ध्यानीमनीही नव्हते. तसेच विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी देऊन भाजपने असाच धक्का दिला होता.
आताही आपला हिंदुत्वाचा अजेंडा बाजूला ठेऊन जातीय आणि धार्मिक समीकरणे जुळवण्यासाठी आपल्या निर्णयाचा काय उपयोग होऊ शकतो, याचा विचार करून भाजपकडून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच कोणी विचारही केला नसेल असे नाव अचानक समोर येण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे.
विशेष म्हणजे भाजपचा मुस्लिम चेहरा आणि फारसे चर्चेत नसलेले नेते मुख्तार अब्बास नक्वी यांच्या नावाची चर्चा आहे. केंद्रात मंत्री असलेल्या नक्वी यांना ही संधी दिली जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा आहे. नक्वी हे बऱ्याच काळापासून भाजपशी संबंधित असून वादांपासून ते लांबच राहीले आहेत. वादग्रस्त विधाने न करणे आणि समुदायात सरकारची चांगली प्रतिमा ठासवणे हे काम त्यांनी केले आहे. त्यांचे व्यक्तीमत्व आणि मुस्लिम समाजाच्या दृष्टीने आश्वासक चेहरा म्हणून त्यांची निवड होऊ शकते.
तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सोहम भोईटे प्रथम |
शिंगणापूर रोडवर ट्रीपल सीट दोन दुचाकीची समोरासमोर भीषण धडक |
‘शिवसंग्राम’चे विनायक मेटे यांचे अपघातात निधन |
राकेश झुनझुनवाला यांचं निधन, शेअर मार्केटमधील बादशाह गेला! |
भटक्या विमुक्त जमाती संघटना दि. १५ ऑगस्ट रोजी काढणार झेंडा रॅली |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यांवर छापे |
दोन वेगवेगळ्या दारू अड्डयांवर छापे |
फलटण येथील जयवंत नगर परिसरात घरफोडी |
शेडमधून ३० हजार रुपये किंमतीच्या प्लेटा चोरीस |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकींची चोरी |
कंटेनर-इरटीका कार अपघातात तीनजण जखमी |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातात नुकसान केल्या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने दोन जण ठार; दोन महिला गंभीर |
नातवाने केला आजीचा डोक्यात दगड घालून खून |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यांवर छापे |
दोन वेगवेगळ्या दारू अड्डयांवर छापे |
फलटण येथील जयवंत नगर परिसरात घरफोडी |
शेडमधून ३० हजार रुपये किंमतीच्या प्लेटा चोरीस |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकींची चोरी |
कंटेनर-इरटीका कार अपघातात तीनजण जखमी |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातात नुकसान केल्या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने दोन जण ठार; दोन महिला गंभीर |
नातवाने केला आजीचा डोक्यात दगड घालून खून |
सातारा येथे वीर पत्नींचा सन्मान |
सातारा जिल्हा बँकेचा सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून सन्मानपूर्वक सत्कार! |
महाराष्ट्रात विकास कामांसाठी अठरा हजार कोटी रुपयांची मागणी : शंभूराज देसाई |
सातारा येथे केंद्रीय विद्यालयाची खा. उदयनराजे यांची मागणी |
औषध निर्माण क्षेत्रात संशोधनात्मक मनुष्यबळाची नितांत गरज |