04:09pm | Mar 06, 2021 |
अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवत भारताने चार कसोटी सामन्यांची मालिका 3 - 1 खिशात घातली. तीनच दिवसांत संपलेल्या या कसोटीत भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 25 धावांनी पराभव केला. या मालिका विजयाबरोरबरच भारतीय संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये दिमाखदार प्रवेश केला आहे. जूनमध्ये लॉर्ड्स मैदानावर होणार्या फायनलमध्ये भारत विजेतेपदासाठी न्यूझीलंडविरुद्ध खेळले.
दरम्यान, कसोटी सामन्याच्या तिसर्या दिवशी भारताने कालच्या 7 बाद 294 धावांच्या पुढे खेळण्यास सुरूवात केली. वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल मैदानावर होते. या दोघांनी आठव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून संघाला पहिल्या डावात 150 च्या पुढे आघाडी मिळून दिले. पटेल अर्धशतकाच्या आणि सुंदर शतकाच्या जवळ आला असता परंतू एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात पटेल 43 धावांवर बाद झाला. त्यानंतर इशांत शर्मा शून्यावर बाद झाला आणि त्याच ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर मोहम्मद सिराजला बाद करत बेन स्टोक्सने भारताचा 365 धावांवर ऑल आउट केला. यात सुंदरचे शतक फक्त चार धावांनी हुकले. ने 174 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकारासह 55.17च्या स्ट्राइक रेटने नाबाद 96 धावा केल्या.
भारताने पहिल्या डावात 160 धावांची आघाडी घेतली. इंग्लंडच्या दुसर्या डावाची सुरूवात खराब झाली. अश्विनने क्रॉली आणि जॉनी बेयरस्टोला बाद करत इंग्लंडची अवस्था 2 बाद 10 अशी केली. त्यानंतर अक्षर पटेलने डॉमनिक सिबलीला माघारी पाठवत इंग्लंडला तिसरा धक्का दिला. तर अश्विनने पुन्हा एकदा बेन स्टोक्सला बकरा केले. त्याने स्टोक्सला शून्यावर माघारी पाठवत इंग्लंची अवस्था 4 बाद 30 अशी केली.
पाचव्या विकेटसाठी जो रूट आणि ओली पोप हे दोघे काही काळ पिचवर टिकले. दोघांना 35 धावा करता आल्या. पोपला अक्षरने 15 धावांवर बाद केले. त्याच्या पुढील ओव्हरमध्ये अश्विनने कर्णधार जो रूटला बाद केले आणि भारताच्या विजयातील मोठा अडथळा दूर केला. रुटने 30 दावा केल्या. तो बाद झाला तेव्हा इंग्लंडची अवस्था 6 बाद 65 अशी झाली होती. त्यानंतर सातव्या विकेटसाठी बेन फोक्स आणि लॉरेंन्स यांनी 43 धावांची भागिदारी केली. ही जोडी अक्षरने फोडली. स्लीपमध्ये अजिंक्यने एक शानदार कॅच घेत फोक्सला माघारी पाठवले. डोमिनिक बेसला बाद करत अक्षरने इंग्लंडची आठवी विकेट घेतली. दरम्यान लॉरेंन्सने कसोटीतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. अश्विनने जॅक लीचला बाद करत इंग्लंडची नववी विकेट घेतली. अजिंक्य रहाणेचा पुन्हा एकदा शानदार कॅच घेतला.
पुन्हा एकदा रिषभ पंतची दमदार कामगिरी
चौथ्या कसोटीतील फिरकीची जादू चालली परंतू रिषभ पंतच्या दमदार खेळीने भारताचा डाव सावरला. रिषभने अवघ्या 118 चेंडूंमध्ये 2 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने दमदार शतक ठोकल्याने भारताचा डाव सावरला होता. निम्मा संघ तंबूत परतल्यानंतर देखील रिषभ पंतनं दमदार कामगिरी केली.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |