09:57pm | Nov 25, 2020 |
सातारा : जिल्ह्यात बुधवारी 12 बाधितांचा मृत्यू, तर 178 बाधितांची नोंद झाली. दरम्यान, 109 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला असून 340 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
बुधवार हा जिल्ह्यासाठी धोका असल्याचे सांगणारा ठरला. एकाच दिवसात जिल्ह्यातील 12 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची एकूण संख्या 1 हजार 699 वर पोहोचली आहे. तसेच 178 बाधितांची नोंद झाल्याने एकूण बाधितांचा आकडा 50 हजार 529 वर पोहोचला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विविध रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 109 नागरिकांना कोरोनातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आल्याने जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा 47 हजार 495 वर पोहोचला असून 340 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
12 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये आरफळ ता. सातारा येथील 88 वर्षीय पुरुष, नागठाणे ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, तारळे ता. पाटण येथील 65 वर्षीय महिला. जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये शुक्रवार पेठ ता. सातारा येथील 53 वर्षीय पुरुष, शिरंबे ता. कोरेगाव येथील 72 वर्षीय पुरुष, वडूज ता. खटाव येथील 85 वर्षीय पुरुष, म्हसवे वर्ये ता. सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, संभाजीनगर ता. खंडाळा येथील 85 वर्षीय पुरुष तसेच रात्री उशिरा कळविलेले कोळकी ता. फलटण येथील 38 वर्षीय पुरुष, संत भानुदास नगर ता. फलटण येथील 81 वर्षीय पुरुष, सांगवी ता. जावळी येथील 68 वर्षीय पुरुष, म्हसवड ता. माण येथील 60 वर्षीय पुरुष अशा एकूण 12 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
340 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 40, कराड येथील 15, फलटण येथील 14, कोरेगांव येथील 13, वाई येथील 15, खंडाळा येथील 49, रायगांव येथील 8, पानमळेवाडी येथील 4, मायणी येथील 11, महाबळेश्वर येथील 5, पाटण येथील 9, दहिवडी येथील 18, खावली येथील 21, तळमावले येथील %, म्हसवड येथील 21, तरडगाव येथील 25 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 65 असे एकूण 340 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |