01:01pm | Aug 09, 2022 |
नवी दिल्ली : लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदावरून सुरू झालेल्या वादाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांनी सोमवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहेत. गेल्या १९ जुलैला लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची निवड केली होती. या निवडीवर ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी आक्षेप घेतला होता. या निवडीमध्ये नैसर्गिक न्यायाची पायमल्ली झालेली आहे, असा आक्षेप नोंदविला होता.
यावरून लोकसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या १२ खासदारांनी आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले होते. यानुसार शिंदे गटाच्या बाराही खासदारांनी वकीलांमार्फत हे निवेदन दिले आहेत. यात १८ पैकी १२ खासदारांनी एकमताने गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची निवड केल्याचा दावा केला आहे. शिवसेना खरी कोणती यावरून निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शिंदे गटाने प्रतिज्ञापत्र दाखल केल्याची माहिती लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते राहुल शेवाळे यांनी दिली.
ठाकरे गटाने मागितली वेळ
ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची काही वेळ मागून घेतला आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तसेच सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |