06:09pm | May 08, 2021 |
नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, रुग्णांवर वेळीच उपचार होत नसल्याने वाढत असलेला मृत्यूचा आकडा आणि विविध नियमांवर बोट ठेवत दाखल करून घेण्यास रुग्णालयांकडून दिला जाणारा नकार, या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कठोर पावलं उचलली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांना दाखल करुन घेण्यासंदर्भातील राष्ट्रीय धोरणात मोठे बदल केले आहेत. कोरोना बाधितांना दिलासा देतानाच रुग्णालयांच्या मनमानीला चाप लावण्याचा प्रयत्न केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे.
कोरोना रुग्णांना उपचारासाठी दाखल करुन घेण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय धोरण तयार केलं होतं. यात आरटीपीसीआर चाचणीसह काही नियम घालून देण्यात आले होते. मात्र, मागील काही काळात रुग्णालयांकडून रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार दिला जात असल्याच्या तसेच रुग्णांना ओळखपत्र नसल्यानं प्रवेश नाकारला जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या. या घटनांची दखल घेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांना दाखल करून घेण्याबद्दलच्या राष्ट्रीय धोरणात मोठे बदल केले आहेत.
रुग्णाला दाखल करुन घेण्यासाठी पॉझिटिव्ह टेस्ट सक्तीची असणार नाही. त्याचबरोबर रुग्ण कोणत्याही शहरातील असला, तरी कोरोना संशयित रुग्णाला कोविड केअर सेंटर, पूर्णपणे कोविड समर्पित सेंटर वा पूर्णपणे कोविड रुग्णालयांनी संशयित रुग्णाच्या विभागात दाखल करुन घ्यावं. एकाही रुग्णाला कोणत्याही परिस्थितीत दाखल करून घेण्यास नकार देता येणार नाही. यात ऑक्सिजन वा औषधी या देण्यास सुद्धा नकार देता येणार नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
ज्या शहरात रुग्णालय आहे, केवळ त्या शहरातील नसल्यानं आणि ओळखपत्र सादर करू शकत नसल्यानं कोणत्याही स्त्री वा पुरुष रुग्णास दाखल करून घेण्यास रुग्णालयांना नकार देता येणार नाही. गरजेच्या आधारावरच रुग्णांना प्रवेश दिला जावा, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |