02:29pm | Jan 25, 2022 |
सातारा : सातारा एमआयडीसीतील देगाव फाटा ते वर्णे आबापुरी या रस्त्याची अत्यंत दूरावस्था झाली आहे. याबाबत वारंवार निवेदने, तक्रारी दिल्यानंतर शासनाने या रस्त्यासाठी निधी मंजूर केला, दोन लोकप्रतिनिधींनी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करुन नारळ देखील फोडले आहेत. मात्र, अद्याप रस्त्याच्या कामास सुरुवात झालेली नाही. येत्या आठ दिवसात या रस्त्याचे काम पूर्ण न झाल्या रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा लोकसाहित्यिक आण्णाभाऊ साठे कृती समितीचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिला आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात चव्हाण यांनी म्हटले आहे की, देगाव फाटा ते वर्णे आबापुरी रस्त्याच्या कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. रस्त्याच्या कामाचा एकदा आमदार शशिकांत शिंदे तर एकदा आमदार महेश शिंदे यांनी नारळ फोडून शुभारंभ केला आहे. मात्र, चार ते पाच महिने होवून देखील या रस्त्याच्या कामास आरंभ झालेला नाही.
सध्या रस्त्याच्या गटर बांधण्याचे काम सुरु असून ते देखील अत्यंत धिम्यागतीने सुरु असून हे कामही निकृष्ट दर्जाचे होत आहे. गेल्या दोन वर्षापासून या रस्त्याची बिकट अवस्था झाली असून फोर व्हिलर, टु व्हिलर गाड्यानां व येण्याजाणाऱ्या कामगारांना व शाळेतील विद्यार्थ्यांना वयोवृध्द लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या कामाची पाहणीही बांधकाम विभागाने करण्याची गरज आहे. रस्त्याची अवस्था बिकट असून शासनाने निधी मंजूर करुन वर्क ऑर्डर काढून ठेकेदाराला काम दिलेले असताना ते गतीने होणे अपेक्षित असताना वर्षभर या रस्त्याचे काम गटराच्या कामात गाळत ठेवले असून नागरिकांना या रस्त्याने प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
हे देगावफाटा ते वर्णे आबापुरी रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे तसेच गटर बांधकाम व रस्त्याचे काम दर्जेदार करावे अशी नागरिकांची मागणी असून बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला सूचना करुन या कामला गती दिली नाही तर दलित महासंघ आण्णाभाऊ साठे कृती समितीच्यावतीने रस्ता रोको आंदोलन छेडू, असा इशारा उमेश चव्हाण व ओंकार निकम यांनी दिला आहे. यावेळी उमेश चव्हाण, ओंकार निकम, मनिषा पाटील तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |