08:33pm | Feb 04, 2023 |
सातारा : ज्यांच्या मागे 50 आमदार व तेरा खासदार आहेत, त्यांना कोणीही उठावे आणि आव्हानं देण्याची भाषा करावी. माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळी मतदारसंघातून निवडून येण्याचे दिलेले आव्हान हे केवळ हास्यस्पद आहे. त्यांची खूपच तयारी असेल तर त्यांनी पाटण मतदारसंघातून येऊन निवडून दाखवावे, असे खुले आव्हान आमदार शंभूराज यांनी दिले.
साताऱ्यात शंभूराज यांनी पत्रकारांशी अनौपचारिकरित्या बोलताना आव्हान- प्रति आव्हानाच्या संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली. माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी वरळी मतदारसंघाचा राजीनामा देतो. तेथून त्यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवावी, असे आव्हान दिले होते. आदित्य ठाकरे यांच्या विधानाचा राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजेसाई यांनी साताऱ्यात चांगलाच समाचार घेतला.
ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे तेरा खासदार आणि पन्नास आमदारांचे पाठबळ आहे. या पाठबळावरच बाळासाहेबांची शिवसेना दमदारपणे सत्तेमध्ये वाटचाल करत आहे. आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचे दिलेले आव्हान हे केवळ हास्यास्पद आहे. आदित्य ठाकरे यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेला दोन आमदार च्या विधान परिषदेवर निवडून द्यावे लागले. शिंदे साहेब लांब राहू देत, आम्ही कार्यकर्ते आहोत त्यांचा समाचार घ्यायला. पुन्हा निवडणूक त्यांना जर लढवायची असेल तर त्यांनी पाटण मध्ये येऊन विधानसभेची निवडणूक लढवून दाखवावी. आदित्य ठाकरे सातत्याने टीका करत असतात. त्यांनी टीका करताना राजकीय विधानांचे भान ठेवावे. त्यांच्या आमदारकीसाठी आमदार सुनील शिंदे यांचे तिकीट कट करावे लागले. सुनील शिंदे व सचिन अहिर यांना विधान परिषदेवर घ्यावे लागले. त्यामुळे आपण काय बोलतो आहोत, याचा विचार करूनच त्यांनी विधाने करावीत, अशी जोरदार टीका शंभूराज देसाई यांनी केली.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |