12:45pm | Dec 16, 2020 |
(प्रकाश राजेघाटगे)
बुध: राज्यातील जवळपास 14 हजार ग्रामपंचापतीच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत नुकतीच पार पडली आहे. निवडणुकीसाठी हे आरक्षण सुटताच भावी सरपंच व पुढारी नेत्यांचे मोर्चेबांधणी सुरू झाली होती. मात्र नुकताच राज्य सरकारने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोडत जाहीर केलेले आरक्षण रद्द केल्याचा निर्णय घेतल्याने भावी सरपंच व गावातील प्रमुख पुढार्यांचा चांगलाच हिरमोड झाला असून सरपंचपदाचा उमेदवार आणि त्याच्यासाठी लागणारा खर्च कोण करणार? हा प्रश्न आता त्यांच्यासमोर उभा राहिल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
राज्यातील जवळपास 14 हजार ग्रामपंचायती तर खटाव तालुक्यातील 90 ग्रामपंचायतीची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून वॉर्ड रचना सोडत जाहीर होताच ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले होते. मात्र राज्य सरकारने नुकताच ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत बद्दलचा निर्णय रद्द करून या सोडतीद्वारे ज्या ग्रामपंचायतींना इच्छुक आरक्षित उमेदवारांनी निवडणुकीसाठी कंबर कसून मोर्चे बांधणीला गावातील पुढारी यासह सुरुवात केली होती तर पॅनलप्रमुख उमेदवार जुळवाजुळवीसाठी मोठी कसरत करताना दिसत होते. हे आरक्षण रद्द करण्यात आल्याने या उमेदवारांचा आणि त्याच पॅनल प्रमुखांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.
आता गावाचा गावगाडा चालवणारे पुढारी हे नवीन आरक्षणाबद्दलचे समीकरण बघता आपल्यावतीचे आणि विश्वासनीय सदस्य यांना पॅनलमध्ये स्थान देऊन पाहताना दिसत आहेत. या आरक्षणाच्या गुंतागुंतीमध्ये पॅनलप्रमुख आणि भावी सरपंच यांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. सामान्य नागरिकाकडून सरकारच्या या निर्णयाचे मोठया प्रमाणात स्वागत करण्यात येत असून आरक्षण उमेदवार आणि त्यांच्यावरती पुढार्याने केलेला खर्च याला कुठेतरी आळा बसेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च नेमका करायचा कोणी ?
एरवी निवडणुकीच्या अगोदर ग्रामपंचायत आरक्षण सोडत होताच गावगाडा चालवणारे गावातील प्रतिष्ठित पुढारी हे आपल्या ऐकण्यातील तथा समर्थनातील उमेदवारांना आपल्या पॅनलमध्ये उमेदवारी देऊन त्या उमेदवाराला फक्त निवडणुकीसाठी उभारण्याचे आव्हान करत होते. त्यांचा सर्व कागदपत्र सहित खर्चही मंडळी करत असत आणि त्यांचा इच्छुक उमेदवार सरपंच केला जात असत. मात्र या निवडणूक आधीच्या आरक्षण सोडत या निर्णय सरकारने रद्द केल्याने मनपसंतीचा सरपंच आणि त्याच्यासाठी करण्यात येणारा खर्च गावगाडा चालवणारा पुढारी नेमका कसा आणि कुणावर करणार असं मोठं संकट आता त्यांचा समोर उभा राहिला आहे तर या निर्णयामुळे गावच्या सरपंच उमेदवारीवरून निवडणुकीचा फड मात्र चांगलाच रंगणार हे निश्चित!!
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |