10:49pm | Oct 19, 2020 |
सातारा : महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश राज्यांमधील एटीएमच्या पैशावर डल्ला मारणार्या दोघांना हरियाणा येथून ताब्यात घेण्यात शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले. यांच्याकडून 5 लाख 61 हजार रुपयांच्या मुद्देमालासह चार लाख रुपये किंमतीची बोलेनो गाडी हस्तगत करण्यात आली आहे. सकरूद्दीन फैजरु रा. धाणोर आणि रवी उर्फ रविंदर चंदरपाक रा. मोहननगर, हरियाणा अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सातारा येथील राधिका चौकात असणार्या कॅनरा बँकेच्या एटीएममधून अनोळखी इसमांनी हातचलाखी करून 2 लाख रुपये रक्कम काढून बँकेची फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अशाप्रकारे घटना घडल्या असल्याचे समोर आल्यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने राधिका चौक येथील घटनेचा वेगाने तपास हाती घेतला. पोलिसांनी संशयितांची माहिती काढून त्यांच्या मागावर राजस्थान येथे पथक दाखल झाले. पोलिसांना पाहताच संशयितांनी बोलेनो गाडीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाठलाग करून दोघांनाही अटक केली. त्यांच्याकडून दीड लाख रुपये रोख रक्कम गुन्ह्यासाठी वापरलेली चार लाख रुपयांची बोलेनो कार, दोन मोबाईल असा एकूण 5 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |