04:56pm | Feb 27, 2021 |
सातारा: शेंद्रे (ता.सातारा) येथील डॉ.दत्तात्रय अंदुरे यांचे खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून कुख्यात गुंडाने न्यायालयाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ं
याबाबत समजलेली माहिती अशी, याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बापू नायर टोळीतील गुंड निलेश बसवंत (रा.अपर इंदिरानगर) याला पोलिसांनी 2015 मध्ये अटक केली होती. यानंतर निलेश बसवंत याने जामीन मिळण्यासाठी चक्क दुर्धर आजारावरील उपचाराचे कारण देत सर्वोच्च न्यायालयात चक्क खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले. सर्वोच्च न्यायालयात हे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालाने निलेश बसवंत याला 16 एप्रिल 2020 पासून जामीन मंजूर केला.
दरम्यान निलेश बसवंत याने न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांबाबत पोलिसांना संशय आला होता. त्यानुसार जामीन मंजूर होण्यासाठी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची पोलिसांनी तपासणी केली. तसेच संबंधित खासगी दवाखान्यात भेट देऊन त्याच्या आजाराबाबतची माहिती घेतली असता कुख्यात गुन्हेगार निलेश बसवंत याने न्यायालयात सातारा येथील शेंद्रेतील डॉ.दत्तात्रय अंदुरे यांचे खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून न्यायालयाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी त्याच्याविरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, प्रवीण शिर्के, सुजीत वाडेकर, राहूल जोशी, विशाल शिंदे, संदेश काकडे आदींनी केली.
वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
वैद्यकीय क्षेत्राला आरोग्य मंदिर असे समजले जाते. आरोग्यसेवा अनेकांना नवसंजीवनी देते. त्यामुळे या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन आदरयुक्त असतो. शेंद्रे (ता.सातारा) येथील डॉ.दत्तात्रय अंदुरे यांचे खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून बापू नायर टोळीतील कुख्यात गुंड निलेश बसवंत याने न्यायालयाचीच फसवणूक केल्याची माहिती मिळताच सातारा जिल्हयाच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
अवैधरित्या गुटखा विक्री करणार्या टोळीचा शहर पोलिसांनी केला पर्दाफाश |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
जुगार प्रकरणी दोघांवर कारवाई |
संगमनगर येथून सायकल चोरी |
अवैधरित्या जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
अजित पवारांसह जात्यंध पक्षां बरोबर गेलेले खासदार आमदार हे देश हिताचे नव्हे : श्रीनिवास पाटील |
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून सातारा लोकसभेसाठी अमित कदम यांना उमेदवारी देण्याची मागणी |
सातारा लोकसभेची जागा भाजपकडे असावी |
खासदार उदयनराजे यांच्या भेटीसाठी गिरीश महाजन जलमंदिरवर |
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस ISO 9001:2015 मानांकन प्राप्त ! |
मसाप, शाहुपुरी शाखेतर्फे बा.सी.मर्ढेकर यांचा उद्या स्मृतीदिन |
गाडी स्टार्ट केली आणि ई बाईकच्या बॅटरीचा झाला स्फोट |
तरुणाचे अपहरण करून लुटणार्यांना केली अटक |
भरारी पथकाने अथवा स्थिर संनिरीक्षण चमू किंवा पोलीस अधिका-यांनी जप्त केलेल्या रकमांचा परतावा करणेसाठी समिती गठीत |
राजवाडा बसस्टॉप वरून रोख रकमेची चोरी |

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
तीन जुगार अड्ड्यांवर छापे |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
खाजगी सावकाराच्या त्रासामुळे एकाचा आत्महत्येचा प्रयत्न |
परवानगीशिवाय निवडणूक कार्यक्रम राबवल्यास कारवाई |