11:27pm | May 26, 2022 |
सातारा : दिल्लीतील त्यागराज स्टेडियम मध्ये खेळाडूंच्या प्रॅक्टिसवेळी कुत्र्यासह फिरणार्या ज्येष्ठ सनदी अधिकारी संजय खिरवाल व त्यांची पत्नी रिंकू दुग्गा यांची दिल्लीतून तडकाफडकी बदली झाली आहे. तर, महाराष्ट्रातील बदनाम उद्योगपती अविनाश भोसलेंनाही मनी लॉंड्रिंग प्रकरणी सीबीआयकडून अटक झाली आहे. खिरवाल असो किंवा भोसले असो. त्यांच्या लिंक सातार्यापर्यंत जोडल्या गेल्या आहेत.
महाबळेश्वर येथील अविनाश भोसले यांच्या फोर ओक्स या बंगल्यामध्ये सुमारे तीन वर्षापूर्वी हेलिकॉप्टरचे अनाधिकृतरित्या लँडिंग तसेच टेक ऑफ झाले होते. सातार्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे त्याबाबत तक्रारीही दाखल झाल्या होत्या. परंतू खाल्ल्या मिठाला जागणार्या श्वेता सिंघल यांनी हेलिकॉप्टर प्रकरणी इतरांवर कारवाई केली परंतू अविनाश भोसले यांच्यावर कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवले नाही. सिंघल यांनी माती खाल्ली. परिणामी त्यांची बदली झाली. त्यांच्या जागेवर शेखर सिंह नावाचा जिल्हाधिकारी बदलून आला. त्याचवेळी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला. शेखर सिंह यांना अविनाश भोसले चे कांड जिरवण्याचे आयते कोलित मिळाले. ‘करता हूँ..., करवा दुँगा’ या नावाखाली सातार्यातील कोविड सेंटरसाठी अविनाश भोसलेंकडून लाखोंमध्ये मदतही घेतली. असो... या पैशाने अनेकांचे जीव वाचले, हीच मेहरबानी.
अविनाश भोसले यांचे राज्यातील अनेक राजकीय पुढार्यांशी व्यवसायिक संबंध आहेत. अविनाश भोसले हे मूळचे सातारा जिल्ह्यातीलच. त्याबद्दल सातारकरांना नेहमीच अभिमान राहिला आहे. परंतू अविनाश भोसलेंनी कृष्णा खोरे मध्ये खोर्याने पैसे हाणले. परंतू सातारकरांच्या करंगळीवर साधी लघुशंका करण्याचेही आतापर्यंत धाडस दाखवले नाही. मात्र हेलिकॉप्टरच्या अवैध लँडिंग तसेच टेक ऑफ प्रकरणी भोसलेंचा पाय खोलात गेला. कोविड सेंटरच्या नावाखाली जिल्ह्यातील मातब्बर अधिकार्यांनी कोविडच्या नावाखाली स्वत:च्या तुंबड्या भरल्या. महाबळेश्वर येथील अविनाश भोसले यांचा फोर ओक्स हा बंगला शासकीय मिळकत आहे. म्हणजेच त्या मिळकतीचा खरे मालक शासन आहे. तीस वर्षांच्या भाडेपट्टा तत्वावर ही मिळकत अविनाश भोसले यांना दिली आहे. याच मिळकतीमध्ये अविनाश भोसले यांनी अनाधिकृतरित्या हेलिपॅड बनविलेले आहे. याच हेलिपॅड वर गेल्या दशकभरात हेलिकॉप्टर्सचे शेकडोवेळा लँडिंग तसेच टेक ऑफ झाले. परंतू जिल्हा प्रशासनाने या लँडिंग तसेच टेक ऑफ कडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला.
एखाद्या शासकीय मिळकतीचा गैरवापर झाल्यास त्याठिकाणी शर्तभंग होतो. शर्तभंग झाल्यास संबंधित मिळकत ही शासनजमा करण्यात येते आणि त्याच अटीवर ही भाडेपट्टा मिळकत संबंधिताला दिली जाते. परंतू चित भी मेरी और पट भी मेरी, या अविर्भावात असणार्या भोसलेंनी मिळकतीसंदर्भात तक्रार असूनही सातारच्या दोन्ही जिल्हाकार्यांस मॅनेज केले. कोविडच्या नावाखाली तुटपूंजी मदत जिल्हा प्रशासनाच्या तोंडावर फेकून तक्रारी अर्ज निकाली काढण्यात आले. तक्रार 2019 ची, निकाली काढली 2022 मध्ये. शासनाचा सेवाहमी कायदा व दप्तर दिरंगाई बासनात गुंडाळून सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नक्की कोणाचे हित साधले, ते पडताळण्याची आता वेळ आली आहे. लोकशाहीमध्ये नोकरशहांकडून उद्योगपतींना तसेच राजकीय पुढार्यांना झुकते माप दिले जाते. परंतू गरीबांना मात्र अक्षरश: भाजून काढले जाते. महाबळेश्वर येथील अविनाश भोसलेंच्या बंगल्यात कोण येतात, कोण जातात याचा तपशील महाबळेश्वरातील शेंबडे पोरगेही सांगू शकते. त्यामुळे अविनाश भोसले व सातारा जिल्ह्यातील अधिकार्यांच्या संबंधाबद्दल एव्हाना सातारा जिल्ह्यासह राज्यभरातही बोभाटा झालेला आहे. अविनाश भोसलेंकडे राज्यातील अनेक नामवंत पुढार्यांचे पैसे आहेत. म्हणजेच भोसले हे त्यांचे कस्टोडियन आहेत. मधल्या काळामध्ये ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालय तसेच सीबीआय चा ससेमिरा अविनाश भोसलेंच्या पाठिमागे लागला. तसतसे सातारा जिल्ह्यातील सनदी अधिकार्यांच्या पायाखालची जमीन सरकू लागली. गेल्या दोन वर्षामध्ये अविनाश भोसलेंबरोबर सातारा जिल्ह्यातील सनदी अधिकार्यांनी अनेक भानगडी करुन जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या मिळकती खरेदी केल्या असल्याची खात्रीलायक माहिती ‘सातारा टुडे’च्या हाती लागली आहे. भविष्यात त्याचाही पर्दाफाश होणार आहे. याबाबत जिल्ह्यातील नागरिकांनी साशंकता बाळगू नये. अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक झालेली आहे. भोसलेंचा पाय खोलात गेलेला आहे. परंतू भोसलेंबरोबर त्यांना मदत करणारे सातारा जिल्ह्यातील सनदी अधिकारी आता रडारावर येणार आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांनी योग्य तपास केला तर गव्हाबरोबर कीडेही रगडले जाणार आहेत.
सातारच्या भूमित इंस्टंट कर्मा
ज्येष्ठ सनदी अधिकारी संजय खिरवाल व त्यांची पत्नी रिंकू दुग्गा दिल्लीत केलेल्या भानगडीमुळे केंद्र सरकारने त्यांची तडकाफडकी बदली केली. कितीही मोठा अधिकारी असला तरी कायद्यासमोर तो दुय्यम आहे, हेच केंद्र सरकारने कृतीतून दाखवून दिलेले आहे. सातारा जिल्ह्याने देशाला दिशा देण्याचे काम केले आहे आणि या सातार्याच्या मातीत उन्माद चालत नाही. संजय खिरवाल त्यांची पत्नी रिंकू दुग्गा किंवा सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह ही त्याला अपवाद नाहीत. रिक्षावाला ते रिअल इस्टेट किंग ठरलेल्या अविनाश भोसलेंनी अनेकांना तांबव्याच्या नदीचे पाणी चाखवलेले आहे. त्यापुढे तर शेखर सिंह तर कस्पटासमान.
फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी आजच होणार |
बाळासाहेबांची शिवसेना आम्ही गगनाला गवसणी घालण्याइतपत मोठी करु |
शुक्रवार १ जुलै २०२२ पासून लागू होणार ११ नवे नियम |
मृत कन्हैय्या लालच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी 24 तासांत 1 कोटीचा निधी |
उद्धव ठाकरे च्याविषयी जनमानसात सहानुभूतीची एक प्रचंड लाट |
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा आम्हालाही आनंद नाही, पण परिस्थितीच अशी उद्भवली |
नव्या मंत्रिमंडळात साताऱ्यातील कोणाची वर्णी लागणार |
भाजप आणि शिंदे गट यांची आधीपासूनच अलिखित छुपी युती |
उद्धव ठाकरेंनी पक्ष वाचवण्यासाठी सत्ता गमावली |
बालविवाह करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौघांवर गुन्हे |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
4 लाख 30 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सोनके येथे सुमारे 73 हजारांची वीजचोरी; दोघांवर गुन्हे |
कराड येथून 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस |
अपघात प्रकरणी चौघांवर गुन्हे |
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा आम्हालाही आनंद नाही, पण परिस्थितीच अशी उद्भवली |
नव्या मंत्रिमंडळात साताऱ्यातील कोणाची वर्णी लागणार |
भाजप आणि शिंदे गट यांची आधीपासूनच अलिखित छुपी युती |
उद्धव ठाकरेंनी पक्ष वाचवण्यासाठी सत्ता गमावली |
बालविवाह करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौघांवर गुन्हे |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
4 लाख 30 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सोनके येथे सुमारे 73 हजारांची वीजचोरी; दोघांवर गुन्हे |
कराड येथून 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस |
अपघात प्रकरणी चौघांवर गुन्हे |
जिल्ह्यातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण |
शेतकऱ्यांनी अद्ययावत कृषी तंत्रज्ञान आत्मसात करून शेती करावी : राहुल जितकर |
भाजपच्या महिला व युवक संपर्क प्रमुखांची पनवेल येथे बैठक संपन्न |
किर्लोस्कर पॉवर टिलर्सच्या माध्यमातून शेतीमध्ये घडवून आणत आहे क्रांती |
मलकापूर नगरपंचायतीतील निधी अपहार प्रकरणाची होणार चौकशी |