सातारा : काल दि. 2 रोजी जिल्ह्यात फक्त 2 कोरोना बाधित सापडल्याने जिल्हावासियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. परंतू आज पुन्हा कोरोनाचे 15 जण बाधित सापडले असले तरी 12 जण कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा मात्र कंट्रोलमध्येच आहे. दरम्यान काल मृत झालेल्या कोळकी, ता. फलटण येथील पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या 24 वर पोहोचली आहे.
आज दिवसभरात जिल्ह्यात 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये कोरेगाव तालुक्यातील कटापूर येथील 62 वर्षीय पुरुष, 24 व 55 वर्षीय महिला, जावली तालुक्यातील वाहगाव येथील 34 वर्षीय पुरुष, काटवली येथील 29 वर्षीय पुरुष व 56 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील वावदरे येथील 45 वर्षीय महिला, माणगाव-अतित येथील 35 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील जांभेकरवाडी येथील 2 वर्षीय बालक, दिवशी मारुली येथील 29 वर्षीय पुरुष, नवसारी येथील 55 वर्षीय सारी आजाराचा पुरुष, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 55 वर्षीय महिला, माण तालुक्यातील दहिवडी येथील 19 वर्षीय युवक, कराड तालुक्यातील तुळसण येथील 62 वर्षीय सारी आजाराचा पुरुष, फलटण तालुक्यातील कोळकी येथील 54 वर्षीय सारी आजाराचा पुरुष, असे एकूण 15 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील आजपर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 571 वर पोहोचली असून 235 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोळकी, ता. फलटण येथील एकाचा मृत्यू पश्चात अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 24 वर पोहोचली आहे.
मृत्यू पश्चात तिघे निगेटिव्ह
बोपेगाव ता. वाई येथील 85 वर्षीय महिला, गिरवी ता. फलटण येथील 65 वर्षीय महिलेचा व वेळेकामथी ता. सातारा येथील 59 वर्षीय पुरुषाचा मृत्यु पश्चात घेण्यात आलेला नमुना निगेटिव्ह आला आहे.
208 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
काल रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार 208 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
मुंबई येथे खासगी प्रयोगशाळेत तपासणी करुन आलेल्या दिवड ता. माण येथील 29 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांना क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल करुन उपचार सुरु आहेत.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |