03:56pm | Jul 23, 2020 |
सातारा: अपुरे शिक्षक, घटत चाललेली विद्यार्थी संख्या, पुर्णवेळ नसलेले प्राचार्य अन् त्यामुळे दुरवस्था झालेल्या पुसेगावच्या विद्यानिकेतनला गतवैभव मिळवून देण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या निर्देशानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, डाएटचे प्राचार्य डॉ. रामचंद्र कोरडे, विद्यानिकेतनचे प्रभारी प्राचार्य बी. एम. वसेकर यांच्या उपस्थितीत या विद्यानिकेतनसाठी दोन कोटी रुपयांचा अल्पकालीन आराखडा तयार करण्यात आला असून जिल्हयातील नामवंत संस्थेतील शिक्षक प्रतिनियुक्तीवर या शाळेत पुर्णवेळ घेण्यात येणार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, की राज्यात धुळे, अमरावती, औरंगाबाद, पुसेगाव (सातारा), केळापूर (यवतमाळ) अशा पाच ठिकाणी शासकीय विद्यानिकेतने आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेऊन उपाययोजना करण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी मागील मार्चमध्ये पुण्यात सर्व संबंधित अधिका-यांची बैठक घेतली होती. त्यास अनुसरून कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांनी पुसेगाव विद्यानिकेतनबाबत त्रैमासिक बैठका घेण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार मागील आठवड्यात पुसेगाव येथे बैठक घेण्यात आली. पुसेगाव पब्लिक स्कूल म्हणून जिल्ह्यात ओळखल्या जाणार्या शाळेचा आजही नावलौकिक आहे. येथे प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास व भोजनासह अन्य सुविधा दिल्या जातात. आजही या शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागतो.राज्यस्तरीय शिष्यवृत्ती स्पर्धा परिक्षेतून येथील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होतात.मात्र अपुर्या शिक्षकांमुळे विद्यार्थी प्रवेश घेण्यास उत्सुक नसतात.
शासकीय विद्यानिकेतन (निवासी) हे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अधिनस्त असून त्याची स्थापना 1966 रोजी कोयनानगर ता.पाटण,जि.सातारा येथे झाली. परंतु सन 1967 च्या प्रलंयकारी भूकंपानंतर कोयनानगर विद्यानिकेतनचे स्थलांतर सातारा येथे करण्यात आले व तद्नंतर सन 1979 पासून पुसेगाव, ता. खटाव,जि. सातारा येथे सुमारे 120 एकर जमीनीत विस्तीर्ण परिसरात सुरु आहे. या विद्यानिकेतनची एकूण 240 विद्यार्थ्यांची क्षमता आहे. शिष्यवृत्तीपरीक्षेतून उत्तीर्ण होणार्या गुणवत्तेनुसार पात्र विद्यार्थ्यांना आदिवासी, अनुजाती/ जमाती, खुला, एनटी इ. प्रवर्गातील आरक्षणानुसार प्रवेश दिला जातो.
विद्यानिकेतनच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासकीय विद्यानिकेतन, पुसेगाव ता.खटाव, जि.सातारा. येथे दि.14 जुलै रोजी सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. प्रथमतः विद्यानिकेतनची सद्यस्थिती, आवश्यक सुधारणा, विद्यानिकेतन प्रशासनात येणार्या अडीअडचणी यावेळी निदर्शनास आणून दिल्या. तदनंतर विद्यानिकेतनच्या दीर्घकालीन व अल्पकालीन आराखडा तयार करण्याबाबत चर्चा झाली.
सहविचार सभेच्या चर्चेमध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या भौतिक, शैक्षणिक, क्रीडा व मनोरंजन आदीसंदर्भात उहापोह झाला. विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाबतीत सैनिकी शाळा व शासकीय विद्यानिकेतने यांची एकत्र प्रवेश परीक्षा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याशी पत्रव्यवहार करणे व मार्गदर्शन घेण्याचे ठरले. क्रीडांगण, क्रीडा प्रशिक्षक, अद्ययावत क्रीडा साहित्य, क्रीडांगण विकास आराखडा व त्याचे नियोजन करण्याकरीता सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी, व सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उचित कार्यवाही करणे व इतर आवश्यक मुद्यांवर चर्चा झाली.
वाहतूक सुविधेमध्ये वाहन व वाहनचालक यांचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करावा असे ठरले. विद्यार्थी वसतिगृहाची रंगरंगोटी सुशोभिकरण, दुरुस्ती व डागडुजी करण्याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. ग्रामिण भागातील विद्यार्थी असल्यामुळे आधुनिक, अद्ययावत डिजिटल क्लासरुम, डिजिटल फळे, प्रत्येक विद्यार्थ्यांना टॅब, प्रोजेक्टरद्वारा सादरीकरण करणे, आयटी लॅब नूतनीकरण, संगणक संख्या वाढविणे इ. सुविधा देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. विज्ञान प्रयोगशाळेचे नूतनीकरण, प्रत्येक विषयाची स्वतंत्र लॅबसाठी पाहणी करणे.तसेच लॅब अटेंडंट पद भरण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ग्रंथालयामध्ये अद्ययावत व आधुनिक पुस्तके, अभ्यासासंदर्भातील ग्रंथ, ई-लायबरी आदी नवनवीन संकल्पना, विद्यार्थ्यांच्यामध्ये वाचनसंस्कृती जोपासण्याच्यादृष्टीने प्रयत्न करणे. विद्यानिकेतन माजी विद्यार्थी संघटना ही राज्यातील पाचही विद्यानिकेतनला आवश्यक त्या भौतिक, शैक्षणिक व आधुनिक इ.सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत बहुमोल सहकार्य,योगदान व मार्गदर्शन करण्यासाठी कायम तत्पर व कार्यशील आहेत. याप्रसंगी आवर्जून संघटनेचेही वसेकर बी.एम. प्राचार्य, शासकीय विद्यानिकेतन पुसेगाव यांनी संघटनेचे आभार मानले.
चित्रकला,कला,कार्यानुभव शिक्षक मानधन तत्वावर नेमणे, अभ्यासिका अद्ययावत करणे, कार्यालयाचे नूतनीकरण, प्रार्थना हॉल डागडुजी करणे, अंतर्गत रस्ते, सुरक्षा व्यवस्था कडक करणे, इंटरनेट सुविधा, मनोरंजन इ. उपाययोजना करण्याचे ठरले. विद्यानिकेतन परिसरात वृक्षारोपण, फळबाग इ. लागवड करणे, सुशोभित करण्यासाठी योग्य ती आवश्यक सुविधा,सुधारणा करण्याबाबत चर्चा झाली. विद्यार्थ्यांना कोविड-19 कालावधीत ऑनलाईन अध्ययन, अभ्यास व अध्यापन तसेच त्यांच्या सतत संपर्कात राहण्याबाबत शिक्षकांना सूचना देण्यात आल्या. त्याचा आढावाही घेण्यात येईल असे सांगण्यात आले. ग्रामिण भागातील प्रतिकूल शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे तेथील बुद्धीमान गुणवान मुलांचा शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकास आणि सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीकोनातून योग्य ते अध्ययन-अध्यापन वातावरण त्यांना उपलब्ध व्हावे यासाठी ही विद्यानिकेतने स्थापन करण्यात आली. अशाप्रकारे शासनाचा उदात्त हेतू व उद्देश लक्षात घेऊन विद्यानिकेतला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे राजेश क्षीरसागर यांनी आवर्जून सांगितले.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |