किमान समान कार्यक्रमांतर्गत अगदी वर्षभरातच सरकारी कामकाज अधिक लोकाभिमुख आणि पारदर्शी पद्धतीने करण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग आणि सांस्कृतिक कार्य अशा महत्वपूर्ण विभागांची जबाबदारी समर्थपणे सांभाळताना माननीय मुख्यमंत्री यांचे मार्गदर्शन आणि मंत्रीमंडळ सहकार्यांच्या समन्वयातून पूर्वीपेक्षा अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून अत्यंत कमी कालावधीत सर्वच विभागांचे साक्षमीकरण करता आले. अवघ्या महाराष्ट्राच्या जनतेने ज्या मनस्वी इच्छेने आणि दृढ विश्वासाने राज्याच्या कारभाराची सूत्रे हातात दिली आहेत. ती जबाबदारी निष्ठापूर्वक, प्रामाणिक आणि पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. याच माध्यमातून महाविकासाच्या दिशेने महाराष्ट्राचे पाऊल पुढे पडते आहे.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण : राज्यातील रुग्णालये अद्यावत व सुसज्ज करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा गतिमान करण्यावर भर देण्यात येत आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील कार्यवाहीस लागणारा विलंब दूर करून जनआरोग्य योजनेस गती व बेळगाव येथील केएलई रुग्णालयासह नवीन रुग्णालयांचा समावेश केला. यामुळे कर्नाटक सीमेवरील नागरीकांना यांचा फायदा मिळत आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीचा दूरदृश्यप्रणालीद्वारे दररोज संपर्क आणि वैद्यकीय मदतीसाठी समन्वय केला जात आहे. आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी कार्यक्रमांतर्गत डिसेंबर 2022 पर्यंत 13 हजार आरोग्यवर्धिनी केंद्रे स्थापित करण्याचे उदिष्टासह सीएचओ प्रशिक्षण केंद्रासाठी मान्यता देण्यात आली आहे. कोरोना कालावधीत आर.टी.पी.सी.आर. आणि एच.आर.सी.टी. चाचणी दर निश्चितीसाठी प्रयत्न. शासनाचा एकही रुपया न खर्च करता लोकसहभागातून 10 व्हेंटिलेटर आणि 100 ऑक्सिजन बेडच्या मोफत अद्ययावत कोविड सेंटरची जयसिंगपूर येथे निर्मिती करण्यात आली.
कोरोना काळात सामान्य नागरिकांना वैद्यकीय सेवा न देणार्या खाजगी डॉक्टरांवर कारवाई करावी, अन्यथा त्यांची सनद रद्द करण्यासंदर्भात सूचनाही केली.
वैद्यकीय शिक्षण : वैद्यकीय महाविद्यालयातील शुल्क आकारणीचा निधी (पी.एल.ए.) रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध, त्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री यांच्याशी समन्वय साधून वित्त व नियोजन विभागाकडून परवानगी. वैद्यकीय शिक्षण प्रवेशाचा 70:30 प्रादेशिक कोटा रद्द करून हजारो विद्यार्थ्यांना थेट फायदा देण्याचा निर्णय. शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयातील पदव्युत्तर निवासी डॉक्टरांसह आयुर्वेद महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात प्रतिमाह रुपये 10 हजार एवढी वाढ केली. कोरोना महामारीच्या काळात सामाईक प्रवेश परिक्षेच्या अर्जास मुदतवाढ, विद्यार्थ्यांना दिलासा दिला. परदेशातील वैद्यकीय पदवी तथा पदव्युत्तर पदवी अहर्ता प्राप्त पात्र डॉक्टरांच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्याबाबत पात्रता परीक्षा त्वरित घेण्यासंबंधी निर्णय घेतला.
अन्न व औषध प्रशासन: कोरोना काळात औषधांचा काळाबाजार, साठेबाजी रोखण्याची खबरदारी आणि रुग्णांना औषधोपचार पुरवठा होण्यासाठी उपाययोजना नियोजन करण्यात आले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाईसह विविध अन्न पदार्थातील भेसळ रोखण्याचे आणि खाद्य तेलाच्या डब्यांचा पुर्नवापर करणार्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले. अन्न व औषध प्रशासनामधील आकृतिबंध मंजूर करून औषध निरीक्षक व अन्न सुरक्षा अधिकार्यांच्या अधिकच्या पदांना मंजूरी देण्यात आली.
वस्त्रोद्योग : राज्यातील रेशीम बीज कोष उत्पादक शेतकर्यांनी विक्री केलेल्या कोषाची रक्कम अदा करण्यासाठी व नवीन अंडीपूंज निर्मितीसाठी महाराष्ट्र सरकारकडून तब्बल 62.74 लाख रुपयांचा निधी वितरित केला. कोल्हापूरमधील जयसिंगपूर कृषि उत्पन्न बाजार समितीत राज्यातील तिसर्या व नवीन रेशीम कोष खरेदी आणि विक्री केंद्रास मान्यता दिल्याने कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकर्यांनी मध्यवर्ती ठिकाणी रेशमी कोष बाजारपेठ उपलब्ध. सहकारी सूतगिरणांच्या अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
सांस्कृतिक कार्य : कोल्हापूर चित्रनगरी येथे चित्रीकरणाला उर्जितावस्था देण्यासाठी प्रयत्न, महामंडळाकडील अखर्चित निधी खर्च करण्यासाठी मान. उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून वित्त व नियोजन विभागाकडून मान्यता. विकास कामांना गती, दख्खनचा राजा मालिकेच्या चित्रीकरणाला प्रारंभ, तसेच सोनी टीव्ही, स्टार टीव्ही आदि वाहिन्यांशी चित्रीकरण करार अंतिम टप्यात. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सर्वांगीण विकासासाठी चित्रपट व मनोरंजन माध्यम धोरण, उत्पन्न वाढीच्या दृष्टीने जागेचा विकास आणि मुंबईत चित्रीकरण परवाण्याबाबत एक खिडकी योजनेसह अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. सांस्कृतिक कार्य विभाग अद्यावत करण्याच्या दृष्टीने अभिलेखांचे मायक्रोफिल्मिंग स्कॅनिंग, अभिलेख व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन, मोडिलिपी प्रशिक्षण वर्ग आयोजन, राज्य स्थापनेचा हिरक महोत्सव नियोजन, महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजनेसह पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे संकेतस्थळ अधिक लोकाभिमुख करण्याचे निर्णय घेतले.
डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर,
राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य.
शब्दांकन : कृष्णदर्शन जाधव
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |