04:21pm | Apr 19, 2021 |
अजित जगताप
सातारा: सार्वत्रिक निवडणुका म्हटलं की, अनेकांना रोजगार मिळतो, प्रचारानिमित पक्ष व प्रचार कार्यालयात गर्दी होते, आता मतदारांसाठी त्याच धर्तीवर कोविड मदत केंद्र लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यानी सुरू करावी अशी पहिली मागणी सातारा जिल्हयातून होऊ लागली आहे. याला किती प्रतिसाद मिळतो? यावर कार्यकर्त्यांचे खरे मूल्यांकन केले जाणार आहे.
याबाबत माहिती अशी की, कोविडचे संकट जगभर पुन्हा आले आहे. सातारा जिल्ह्यात कोविड बाधित रुग्णांची संख्या दुसर्या टप्प्यात दिड हजाराचा टप्पा पार केला आहे. कोणाला बेड मिळत नाही, कोणाला ऑक्सिजन मिळेना, सामान्य कुटुंबातील सदस्य असलेल्या कोविड बाधितांची अवस्था म्हणजे सरकारी पातळीवर ना दाद, खासगी दवाखान्यात उपचारासाठी ना खिश्यात दाम अशी अवस्था पाहण्यास मिळत आहे. अजूनही लोकांना लस मिळत नाही. सरकारी दवाखान्यात लस उपलब्ध नाही, कर्मचार्यांची संख्या कमी असल्याने नातेवाईकांना बाहेरूनच कोविड बाधितांची चौकशी करावी लागत आहे. ही बाब उघड असली तरी त्याचा गाजावाजा होत नाही.
आंदोलनाला बंदी, निवेदन स्वीकारणार्याला बंदी, वरिष्ठ अधिकार्यांना भेटण्यास बंदी, आवाज कोणीही उठवित नसल्याने सातारा जिल्ह्यात एक प्रकारे अघोषित आणीबाणी लादली गेली आहे. घाऊक व्यापार्यांची दुकाने उघडी व ग्रामीण भागातील किरकोळ व्यापारी व लहान दुकानदारांची दुकाने बंद हे विदारक चित्र पाहण्यास मिळत आहे. गरिबांचा रोजगार बुडाला आहे, ग्रामीण भागातील दररोज कष्ट करून उपजीविका करणार्या लोकांचे हाल सुरू झाले आहेत. पूर्वी पहिल्या लॉक डाउन ला मानवता भावनेतून सर्वांनीच मदत केली होती. आता दुसर्या लॉकडाउन मध्ये अनेकांनी हात आखडता घेतला आहे.ही वस्तुस्थिती आहे काही लोकप्रतिनिधी ते ही मान्य करीत आहेत.
सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ग्रामीण रुग्णालये, मोठ्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, पण, वैधकीय अधिकारी मिळत नाहीत. लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठित लोकांच्या घरी वैधकीय शिक्षण पूर्ण केलेले किमान पाचशे डॉक्टर व स्पेशालिस्ट आहेत. त्यांनी मानवता भावनेतून सरकारी दवाखान्यात सेवा दिली तर खर्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपली जाण्याचा वारसा पुढे चालविला जातो, हे सिद्ध होणार आहे, पण, असे दिसून येत नाही. राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधी यांच्या साठी दिवसरात्र काम करणार्या एका ही कार्यकर्त्यानी कोविड मदत केंद्रासाठी मागणी केली नाही. त्यामुळे त्यांच्या समाज्याबद्दल असलेली निष्ठा ही निवडणुकी पुरती असल्याची चर्चा उघडपणे सुरू झाली आहे. आचारसंहिता पाळली जात असताना सातारा जिल्ह्यात गावोगावी निवडणुकीत दारूचा महापूर व मटणाचा ढीग पोहच केला जातो. त्याची तक्रार होऊनही कारवाई होत नाही. हा भाग वेगळा असला तरी आता कोविड संसर्ग टाळण्यासाठी लस व रुग्णासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवून देण्यासाठी कोविड मदत केंद्र उभे करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनीच गट तट व पक्षीय मतभेद बाजूला ठेवून कोविड मदत केंद्र गावोगावी सुरू व्हावे यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी होऊ लागली आहे. यासाठी आवश्यक लागणारी जागा सुध्दा उपलब्ध करण्यास गावकरी तयार झाले आहेत. तरी लवकरात लवकर किमान तालुक्याच्या ठिकाणी असे कोविड मदत केंद्र उभारले जावे अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधी म्हणून महारुद्र तिकुंडे, प्रवीण मोरे, दाऊद मुल्ला, सुनिल उबाळे व चळवळीतील कार्यकर्त्यानी केली आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |