01:09pm | Oct 18, 2021 |
पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटजवळ सोमवारी सकाळी सहा वाहने एकमेकांवर आदळली. तीन कार, एक खासगी बस, एक टेम्पो आणि एक ट्रेलर या अपघातात होते. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आणि सहा जण जखमी झाले. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, दोघांची प्रकृती गंभीर आहे.
आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुण्याहून मुंबईकडे भरधाव कोंबड्या वाहून नेणाऱ्या टेम्पोने पुढे जाणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे पुढील टेम्पो स्विफ्ट कारला धडकला, तर दुसऱ्या टेम्पोने कॉईल वाहून नेणाऱ्या ट्रकला धडक दिली. त्याचवेळी एका ट्रकने खासगी बसला पाठीमागून धडक दिली.
या विचित्र अपघातात स्विफ्ट कार ही दोन टेम्पोच्यामध्ये अडकल्याने कारचा चक्काचूर झाला आहे, तर कारमधील दोन प्रवासी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर टेम्पो चालकाचा देखील या अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस, देवदूत यंत्रणा आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी असलेल्या सामाजिक संघटनेच्या सदस्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कार आणि टेम्पोमधील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.
अपघातामध्ये एकूण सहा प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर पहाटे झालेल्या अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक सुमारे तासभर विस्कळीत झाली होती. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |