- अजित जगताप
सातारा : प्रज्ञा-शील-करुणा म्हणजे बुद्ध मार्ग होय. या मार्गावर जाण्यासाठी मनाची एकाग्रता व मशागत करावी लागते. त्यामुळे बुद्ध की और जाण्यासाठी तयार झालेल्या महाराष्ट्रातील २८ माता-भगिनींनी चक्क श्रामणेरी दिक्षा घेऊन आपली मनोकामना पूर्ण केली आहे. त्यामध्ये सायगाव ता जावळी जि सातारा येथील श्रामणेरी सुजाता तथा सौ वंदना अरुण जगताप यांचा समावेश आहे.
याबाबत माहिती अशी की,कॊरोनाचे संकट दूर झाल्यानंतर अनेकांना जीवनाचा अर्थ समजला होता. प्रेक्षणीय स्थळे पाहण्यापेक्षा थेट ज्याठिकाणी भगवान बुद्ध यांनी ज्ञान प्राप्त झाली. अशा बुद्धगयेला भेट देण्याचा संकल्प काहींनी केला. त्याप्रमाणे नालगिरी धम्म यात्रा प्रतिष्ठान, मुंबईचे आयोजक सपना सोनावले यांच्या मार्गदर्शनाखाली दि १७ मार्च२०२१ रोजी बुद्धगयेला जाण्याचा निर्णय जगताप कुटूंबानी घेतला. त्याठिकाणी बौद्धमय वातावरणात मन प्रसन्न झाले. आयुष्यभरची जपलेली आसक्ती ठेवायची नाही. असा निर्धार केलाच होता. त्यानुसार सौंदर्याची भर घालणाऱ्या डोक्यावरील लांब सडक काळ्याभोर केसांचा त्याग सौ वंदना जगताप यांनी करून मार्गक्रमण सुरू केले . बिहार येथील मुआबाद येथील मुख्य बुद्ध विहारात नाग पौर्णिमा दिनी बुद्ध की और जाण्याचा मार्ग मोकळा झाला.७५ श्रामणेरी नियमांचे पालन करून आज अनेक कुटुंबातील सदस्य बुध्दाशी जोडले गेले आहेत.
दहा परिभाषा, पंचशील, अष्टशील, वंदना नियमित ग्रहण करून श्रामणेरी सुजाता या एस. संघमित्रा थेरी,भन्ते आयुपाल थेरो यांच्या शिकवणीनुसार आचरण करीत आहेत. चिवर परिधान करून तसेच भिक्षापात्र घेऊनच बुद्ध धम्म प्रसाराचे महान कार्य त्यांच्या हातून होत असून आयु, अरुण शंकर जगताप यांची या कार्याला मोलाची साथ लाभत आहे. पहाटे पाच वाजल्यापासून ध्यानधारणा व बुद्ध वंदना घेऊनच दिवसाचा आरंभ होत आहे. जो मनाने शुध्द तो खरा बुद्ध याची जाणीव व प्रचिती आली आहे. संपदा, नम्रता, स्नेहा या तीन विवाहित मुली, जावई, नातवंड यांची ही धम्म कार्याला साथ लाभली आहे.१९३१ साली बौद्ध धम्म प्रसारासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांचे संघटन उभे करण्याचे आवाहन केले होते. त्याचे पुनर्जीवन होण्यासाठी पुन्हा एकदा चांगली सुरुवात झाली आहे.
अखिल भारतीय भिखु संघाने केलेले आदरार्थी स्वागत कधी ही विसरता येणार नाही.असे त्यांनी सांगितले. २९ श्रामणेरी थेरी यांचे जीवनमान बुद्धमय बनल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान त्यांच्या मानसिक श्रीमंतीचे दर्शन घडवित आहेत. ४१ वर्षाच्या संसारी प्रवासानंतर त्यांना अंतिम टप्प्यात बुद्ध मार्ग मिळाल्याचा आनंद वाटत आहे. त्यांच्या जीवनपट्टातील बदल घडवून आणला गेला आहे. भविष्यात त्यांच्या मार्गाचे अनुकरण करण्याचा संकल्प अनेक धम्मबंधु-भगिनी करतील असा विश्वास जेष्ठ श्रामणेर वामन दादा जगताप, प्रेमानंद जगताप तसेच ऍड शशिकला उत्तम जगताप, गौरी जगताप, श्रीकांत जगताप,अनिकेत जगताप, मिलिंद जगताप, शिरीष जगताप, गौतम जगताप,अजय जगताप, अमोल जगताप, प्रतीक जगताप, उत्तम जगताप,नंदकुमार जगताप,अविनाश जगताप, श्रीमती नानी सपकाळ, श्रीमती शारदा बगाडे, श्रीमती विजया जगताप,सौ शारदा जगताप, बापूसाहेब जगताप, सुधीर जगताप, प्रकाश जगताप,अनिल जगताप,जयवंत जगताप, विजय जगताप,अशोक जगताप,तुषार जगताप, सौ छाया जगताप व किसान नाना जगताप, धम्म बंधू चंद्रसेन जगताप व मान्यवरांनी व्यक्त केला आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |