ठोसेघर : डोंगरी दुर्गम भागात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. या गुणवत्तेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर शैक्षणिक विकास वेगाने होईल, असे विचार सौ. उज्वला पलांडे यांनी आदर्श माध्यमिक विद्यालय ठोसेघर येथील कार्यक्रमात बोलताना मांडले.
सुझलॉन फाउंडेशन पुणे यांच्या वतीने आदर्श माध्यमिक विद्यालयास सोलर पॅनल, एलईडी प्रोजेक्टर आणि इयत्ता पाचवी ते दहावी इयत्तांचे ई-लर्निंग किट मोफत भेट देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कोरोना काळात शाळा बंद असल्याने डोंगरी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची खूपच हेळसांड झाली. ही महत्त्वाची गरज ओळखत सुझलॉन फाउंडेशन पुणे यांचेकडून विद्यालयास अत्यंत उपयुक्त असे साहित्य भेट देण्यात आले. या मदतीमुळे विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांना अध्ययन-अध्यापन सुलभ होऊन गुणवत्ता वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे. ही मदत मिळणे कामी श्रीरंग चव्हाण तसेच राजेंद्र घाडगे यांनी मोलाचे सहकार्य केले.
याप्रसंगी सुझलॉन फाउंडेशनच्यावतीने डॉ. घोरपडे, प्रवीण पवार, प्रकाश कदम, विलास साळुंखे, सागर भाकरे, विनोद तरडे, संजय शिवदास इ. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शंकरराव चव्हाण आप्पा (माजी पंचायत समिती सदस्य सातारा) तसेच जयराम चव्हाण (उपसरपंच, ठोसेघर), सौ पुनम माने, शंकरराव बेडेकर, विलास सुतार, अशोक काकडे, जगन्नाथ बेडेकर, राहुल गायकवाड, मुख्याध्यापक सतीश जाधव, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. श्रीमंत कदम यांनी प्रास्ताविक केले. अशोक कदम यांनी स्वागत व सत्कार सूत्रसंचालन केले. सौ शुभांगी कदम यांनी विद्यालय आणि ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |

बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |