07:36pm | Nov 24, 2020 |
वाई : आनेवाडी टोल नाका हस्तांतरण व ताबा प्रकरणात खा.उदयनराजे व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात झालेल्या धुमश्चक्री प्रकरणी सुनावणीसाठी खा.उदयनराजे भोसले वाई न्यायालयात आज सुनावणीसाठी हजर झाले.
आनेवाडी टोलनाक्याचे व्यवस्थापन खा. उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडे होते. हे व्यवस्थापन आपल्याकडे घेण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रयत्नशील होते. टोलनाक्याचे व्यवस्थापन हस्तांतरावरुन उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यामध्ये वाद होता. 6 आक्टोबर 2017 रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आनेवाडी टोल नाक्याचा ताबा घेण्यावरून खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यात व त्यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार धुमश्चक्री झाली.
जमावबंदीचा आदेश लागू असताना ही धुमश्चक्री झाली होती. त्यामुळे या परिसरातील वातावरण तंग झाले होते. यावेळी टोल नाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी उदयनराजे व अन्य पंधरा जणांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
टोल नाक्यावर झालेला धुमश्चक्रीनंतर सातारा येथे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या घरासमोर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला होता. त्यावेळी अज्ञाताकडून गोळीबरही करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये उदयनराजेंचे कार्यकर्ते न्यायालयात हजर झाले होते. मात्र उदयनराजे हजर झाले नव्हते. उदयनराजेंवर अनेक वेळा साक्षी समन्स बजावण्यात आले होते. याकामी आज दुपारी खा. उदयनराजे, अशोक सावंत, राजू गोडसे, बाळासाहेब ढेकणे, सनी भोसले, मुरलीधर भोसले, अजिंक्य भोसले, इम्तियाज बागवान, बंडा पैलवान, किरण कुर्हाडे आदी प्रमुख संशयितांसह स्वतःहून खा. उदयनराजे वाई न्यायालयात हजर झाले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही एन गिरवलकर यांच्यासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकूण पुढील सुनावणी दि 7 डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.सरकार पक्षाच्या वतीने मिलिंद पांडकर यांनी, तर उदयनराजेंच्या वतीने ताहेर मणेर यांनी काम पाहिले.
उदयनराजे न्यायालयात उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी न्यायालय परिसरात गर्दी केली होती. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |