05:46pm | Mar 14, 2022 |
कराड : सुर्ली, ता. कराड येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ यांच्या नेतृत्वाखालील सुरजाईदेवी ग्रामविकास पॅनेलने १३/० असा दणदणीत विजय संपादन केला. अटीतटीच्या झालेल्या सुर्ली सोसायटी निवडणुकीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, भाजपा नेते रामकृष्ण वेताळ यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सरासरी १०० ते १२० च्या मताधिक्याने सर्व संचालक निवडून आले.
रामकृष्ण वेताळ म्हणाले, सर्वसामान्य शेतकरी केंद्रबिंदू मानून सुर्ली गावातील सर्वांनाबरोबर घेत कार्यकर्त्यांच्या पाठबळावर ही निवडणूक आम्ही जिंकली आहे. यापुढील काळातही गावच्या सोसायटीच्या प्रगतीसाठी व सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. हा विजय म्हणजे सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी व कार्यकर्त्यांनी केलेल्या अपार मेहनतीचा विजय आहे. तसेच महिला सभासद व कार्यकर्त्यांच्या विश्वासामुळे मोठा विजय झाला आहे.
या निवडणुकीत नवनिर्वाचित संचालक म्हणून अरुण माने, बळवंत वेताळ-पाटील, हणमंत वेताळ, नानासो वेताळ, युवराज ढमाले, संजय वेताळ, शंकर वेताळ, संभाजी वेताळ, सदाशिव तोडकर, दिलीप भिसे, बापूराव वलेकर, द्रोपदा फुके व कमल चव्हाण हे संचालक मोठ्या मताधिक्याने निवडून आले.
सुर्ली, वि.का.स.सेवा सोसायटी निवडणुकीच्या दणदणीत यशाबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, खा. श्री.छ.उदयनराजे भोसले, आ.श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.अतुल भोसले, अॅड. भरत पाटील, राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जि.प. सदस्य सागर शिवदास, पं.स. सदस्य चंद्रकांत मदने व सुरेश कुंभार, भाजपा कराड उत्तर तालुकाध्यक्ष महेशकुमार जाधव, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुरेशतात्या पाटील, अॅड. महादेव साळुंखे, महिला जिल्हा सरचिटणीस दीपालीताई खोत यांनी रामकृष्ण वेताळ यांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |