11:06pm | Aug 12, 2020 |
सातारा : जिल्ह्यात बुधवारी उच्चांकी 304 कोरोनाबाधित निष्पन्न झाले. दिवसभरात 5 जणांचा कोरोनाचे उपचार सुरु असताना मृत्यू झाला असून 87 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 624 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारकरांसाठी बुधवार घातक ठरला. या एकाच दिवसात 304 नवीन कोरोनाबाधित निष्पन्न झाले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 6504 वर पोहोचला. तसेच पाचजणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या 197 वर पोहोचली आहे. याचबरोबर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 62 नागरिकांना तसेच सातारा शहरातील खाजगी रुग्णालयांतून 25 जण अशा एकूण 87 जणांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले, तर 624 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे कोरोना टेस्टिंग लॅब सुरु झाली असून त्यात करण्यात आलेल्या चाचणीत 25 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 4, कराड तालुक्यातील 14, खंडाळा तालुकयातील 5, कोरेगांव तालुक्यातील 1, खटाव तालुकयातील 5, महाबळेश्वर तालुक्यातील 1, माण तालुक्यातील 8, पाटण येथील 1, सातारा येथील 16 व वाई तालुक्यातील 7 असे एकूण 62 नागरिकांचा समावेश आहे. तसेच सातारा शहरातील खाजगी रुग्णालयांतून 25 जणांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले.
25 जणांचा अहवाल कोरोना बाधित
स्व. क्रातीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील लॅबमध्ये तपासणी करण्यात आलेल्या 25 जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे.
यामध्ये फलटण तालुक्यातील सोनवडी खु. येथील 39 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला 12, 8 वर्षीय बालक, शिंदेवाडी येथील 70 वर्षीय पुरुष, नांदळ येथील 23,47 वर्षीय महिला, दत्तनगर येथील 32 वर्षीय महिला, सासवड येथील 60 वर्षीय पुरुष, फडतरवाडी येथील 22 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 64 वर्षीय पुरुष, कोर्हाळे येथील 49 वर्षीय पुरुष., खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील 30 वर्षीय पुरुष., खटाव तालुक्यातील पळशी येथील 55 वर्षीय पुरुष, 28,49,75 वर्षीय महिला व 2 वर्षीय बालीका, वडुज येथील 15,3 वर्षीय बालक 67 वर्षीय पुरुष, 57, 36 वर्षीय महिला, पुसेगांव येथील 40 वर्षीय पुरुष, वाकेश्वर येथील 65 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
5 जणांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे कंधारवाडी ता. कराड येथील 55 वर्षीय पुरुषाचा, कराड येथील खासगी हॉस्पीटलमध्ये विठ्ठलनगर कराड येथील 51 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ येथील 84 वर्षीय महिला व वाजेगाव ता. पाटण येथील 72 वर्षीय महिला तसेच कृष्णा हॉस्पीटल, कराड येथे शनिवार पेठ, कराड येथील 30 वर्षीय पुरुषाचा असे एकूण 5 कोरोना बाधितांतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचेही अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिल सोनवणे यांनी सांगितले.
624 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 36, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 12, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 28, कोरेगाव 45, वाई येथील 100, शिरवळ येथील 83, रायगाव 23, पानमळेवाडी येथील 35, मायणी येथील 38, महाबळेश्वर येथील 65, पाटण येथील 25, खावली 81, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे 53 असे एकूण 624 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |