पुसेगाव : पुसेगाव येथे आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भरघाव ट्रकने मोटार सायकलला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेमुळे झालेल्या अपघातात मोटारसायकल चालक गंभीर जखमी, तर चालकाची पत्नी जागेवर ठार झाली.
याबाबत पुसेगाव पोलिसांनी सांगितले, आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पुसेगाव - सातारा रस्त्यालगत असलेल्या सेवागिरी द्रोण-पत्रावळी पूजा साहित्याच्या दुकानासमोर विशाल अनिल मोरे (वय 22, रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) हे पत्नी पूजा (वय 19) यांच्यासह मोटारसायकलवरुन साताऱ्याकडे चालले होते. त्याचवेळी आयुब नुरमहंमद भालदार (रा. करंजेनाका, सातारा) हा ट्रक घेऊन साताऱ्याकडे चालला होता. या भरधाव ट्रकने विशाल मोरे यांच्या मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात विशाल यांची पत्नी पूजा या जागेवर ठार झाल्या, तर विशाल मोरे हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची फिर्याद लखन भिमराव मोरे (वय 32, रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिस नाईक व्ही. एम. भोसले घटनेचा तपास करत आहेत.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |

आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |