04:59pm | Dec 31, 2020 |
पुसेगाव: कोरोना काळात पालकांवरील 12 वी नंतरच्या शिक्षणाचा खर्च कमी करण्यासाठी आयआयबीएम शिक्षण संस्था व महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण मंडळाच्या वतीने शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. त्यासाठी पालकांनी पाठवलेल्या लिंकवर 550 रुपये भरुन नोंदणी करावी असा पालकांच्या व्हॉटस अॅपवर मॅसेज व संबंधित लिंक पाठवण्यात येत आहे. परंतु शासनाने अशाप्रकारची कोणतीही माहिती प्रसिध्दीस दिलेली नसताना शिष्यवृत्तीचे आमिष दाखवून पालकांकडून पैसे उकळण्याचा हा नवीन फंडा तर नाही ना ? अशी विचारणा होत आहे.
यावर्षी बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्वच पालकांना असे मॅसेज आल्यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोनामुळे रोजगारास मुकल्यामुळे व व्यवसाय अडचणीत आल्याने आधीच लोक आर्थिक संकटात आहेत. 12 ावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षांचेही निकाल जाहीर झाले असून सध्या अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी, व्यवस्थापन व अन्य व्यावसायिक शिक्षणांच्या प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्या आहेत. अशावेळी 12 वी उत्तीर्णांच्या सर्रास पालकांना फोन करुन या शिष्यवृत्तीची माहिती देण्यात येत असून त्यानंतर व्हॉटस अॅपवर लिंकही पाठवली जात आहे.
स्वच्छ मराठी बोलू न शकणारी परराज्यातील महिला फोनवरुन उत्तीर्ण झालेल्यांचे संपूर्ण नाव सांगत असल्याने पालकांचाही त्यावर विश्वात बसत आहे. पण लिंकवर पाठवलेली माहिती पूर्ण भरल्यानंतर शेवटी 550 रुपये भरल्यानंतर नोंदणी पूर्ण होत असल्याने काही पालकांनी याबाबत शंका उपस्थित केली आहे.
शिष्यवृत्तीसाठी शासन कधीही पैसे घेत नाही. शिवाय एकाद्या पालकांने लिंक पूर्ण भरली नाही तर त्याला वारंवार फोन करुन तसेच व्ह़ॉटस अॅपवर मॅसेजेस पाठवून नोंदणी करण्यासाठी तगादा लावला जात आहे. शिष्यवृत्तीसाठी असा तगादा कधीही लावला जात नाही. एकूणच प्रकरण संशयास्पद असल्याने पालक संभ्रमात आहेत. आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी त्यांना चागल्या व्यावसायिक शिक्षणाला प्रवेश मिळावा, त्यांचे भवितव्य घडावे ही प्रत्येक पालकांची स्वाभाविक इच्छा असते. कोरोनामुळे कुटूंबाची आर्थिक घडी विस्कटलेली असताना लोक मुलांच्या प्रवेशासाठी प्रयत्नशिल आहेत. प्रवेशपरीक्षा, कागदपत्रांची जमवाजमव व त्यानंतर प्रवेश प्रक्रियेला सामोरे जाणे हे खर्चिक असतानाच शिष्यवृत्तीच्या या फसव्या आमिषाला बळी पडू नयेत.
आर्थिक संकटात असताना 550 रुपयांचा भुर्दंड हा थोडका नाही. त्यामुळे संबंधित मॅसेजच्या सत्यतेची शहनिशा संबंधित खात्याने व अधिकार्यांनी करावी, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.दरम्यान शिष्यवृत्तीसाठी शासनाकडून कधीही पैसे मागितले जात नसल्याने अशाप्रकारच्या आमिषाला बळी न पडता पालकांनी दक्ष रहावे असे आवाहन पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी केले आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |