10:10am | Jan 27, 2022 |
कराड : हुमणी किडीने सध्या डोके वर काढले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिकांच्या एकरी उत्पादन वाढीवरही याचा परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड ही सोसावा लागणार आहे. त्याचा विचार करून महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कराड येथे सुरू असलेल्या शासकीय कृषी महाविद्यालयात हुमणीवरील नियंत्रणासाठी "फुले मेटार्हिझियम" ही पावडर संशोधित केली आहे. त्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव कमी होत असून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान कमी होण्यास मदत होत असल्याचा दावा डॉ.प्रा.आय.ए. घोनमोड यांनी केला आहे.
जिल्ह्यात शेती पिकांवर हुमणी व अमेरिकन लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतीपिकांच्या एकरी उत्पादनात घट होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील वर्षीपासून ऊस, भुईमूग, सोयाबीन, कापूस, नारळ या पिकांवर हुमणी किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तसेच फळे, भाजीपाला, मका, हरभरा पिकांवर रस शोषणाऱ्या कीड, पतंग यांचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. म्हणून हुमणी व रस शोषणाऱ्या किड तसेच पतंग यांच्या नियंत्रणासाठी कृषी महाविद्यालय कराड येथे ‘फुले मेटारायझियम’ पावडर तयार केली आहे.
त्याचबरोबर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव हा मका व रब्बी ज्वारीवर दिसून आला होता. या किडींच्या नुकसानीची तीव्रता यावर्षी वाढण्याची शक्यता असल्याने कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून मार्गदर्शन व प्रचारावर भर देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी खड्डे घेऊन त्यामध्ये पिवळा व निळा रंगाचा प्लास्टिक कागद अस्तरीकरण करून त्यामध्ये पाणी, रॉकेल किंवा कीटक नाशक टाकावे. तसेच त्यावर संध्याकाळी ७ ते १० या कालावधीत बल्ब लावावेत. त्यामुळे हुमणी किडीचे भुंगेरे प्रकाशाकडे आकर्षित होऊन त्यांचे नियंत्रण होते. त्याचबरोबर कृषी विभागाकडून अनेक उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. त्यातून या किडींच्या नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहे.
मात्र, त्यावर इलाज शोधण्याचे काम महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कराड येथील शासकीय कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, कीटकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. आय.ए. घोनमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशाखा भालचिम, गौरव भोसले, अनुजा गाढवे, प्रतिक्षा गवळी, सौरभ गिरगोसावी, आदित्य काटकर, प्रतिक कोथिंबीरे, अर्चना पाटील, शिवांजली वर्णेकर, सुशांत वरुटे, प्रज्वल मिसाळ, स्नेहल पाटील, सई साळुंखे या विद्यार्थ्यांनी केले आहे. त्यांनी हुमणीवरील नियंत्रणासाठी "फुले मेटार्हिझिअम" पावडर मोठ्या प्रयत्नानंतर संशोधित केली आहे. त्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव कमी होऊन पिकांचेही नुकसान कमी होण्यास मदत होणार असल्याचेही डॉ. आय. ए. घोनमोडे यांनी सांगितले आहे.
पावडर वापरायची पद्धत
हुमणीच्या नियंत्रणासाठी 20 ग्रॅम प्रति लिटर व 2 किलो प्रति एकरी पावडर वापरायची आहे. तसेच रस शोषणाऱ्या किडी व पतंगांच्या नियंत्रणासाठी ५ ग्रॅम प्रति लिटर व प्रति एकरी पावडर वापरायची आहे. त्याचबरोबर एका फवारणीपूर्वी आणि त्यानंतर एक आठवडा रासायनिक खतांचा वापर करू नये. ही पावडर शेतकऱ्यांसाठी कराडच्या कृषी महाविद्यालयातील कीटकशास्त्र विभागात अत्यल्प किंमतीत (२०० रुपये किलो) उपलब्ध करण्यात आली आहे.
- डॉ.प्रा.आय.ए. घोनमोड - 7276066627
कराड, शासकीय कृषी महाविद्यालय, कीटकशास्त्र विभाग
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |