11:47pm | Aug 09, 2020 |
कराड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विभागातील रिक्त असलेली पदे तात्काळ भरावीत, रुग्णालयातील व्हेंटिलेटर व खाटांची संख्या वाढवावी, गरज असणाऱ्या आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात अशा विविध मागण्यासह जिल्ह्यातील आरोग्य विभाग बळकट करण्याबरोबर नागरिकांना आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी खा. श्रीनिवास पाटील यांनी राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्याकडे केली. सातारा जिल्हाच्या मागणीवर आरोग्यमंत्री त्वरीत कार्यवाहीला सुरुवात देखीक केली.
जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार व आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे रविवारी कराड येथे आले होते. त्यावेळी झालेल्या भेटीत खा.श्रीनिवास पाटील यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभाग व नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक असणा-या बाबींकडे लक्ष वेधले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राना पुरेशा प्रमाणात मास्क, सॅनिटायझर, औषधे व इतर साहित्याची खरेदी करण्याकरिता निधी उपलब्ध करून द्यावा. सातारा रोड, बामणोली व वाठार स्टेशन येथील प्राथ. आरोग्य केंद्राना रुगणवाहिका नाहीत. त्यामुळे त्या केंद्रांना प्राधान्याने नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात म्हणजे आरोग्य सेवा, सुविधा पुरविणे सोयीचे होईल असे त्यांनी यावेळी सुचविले.
जिल्हयातील वर्ग 1 व 2 संवर्गातील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी 3 पदे, सहायक संचालक (कुष्ठरोग), जिल्हा क्षयरोग अधिकारी, प्रशासन अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी 3 पदे, वैद्यकीय अधिकारी 1 ही पदे रिक्त आहेत. याशिवाय वर्ग 3 संवर्गातील औषध निर्माण अधिकारी 14, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 5, आरोग्य पर्यवेक्षक 9, आरोग्य सेवक (पु) 291, आरोग्य सेवक (म) 363 आदी पदे रिक्त आहेत. ही पदे रिक्त असल्याने राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी राबविण्यात अडचणी येत आहेत. ताळागाळातील गोरगरीब लोकांना आरोग्य सेवा देण्यासाठी ही पदे तात्काळ भरण्यात यावीत.
कराड, पाटण तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कराड मधील उपलब्ध हॉस्पिटलात व्हेंटिलेटरची संख्या लोकसंख्येच्या तुलनेने खूपच कमी आहे. कृष्णा हॉस्पिटल येथे 12, सह्याद्रि हॉस्पिटल 9 व शारदा हॉस्पिटल येथे 7 व्हेंटिलेटर उपलब्ध असून त्याचे प्रमाण कमी आहे. या हॉस्पिटलमध्ये कराड तालुक्यासह जिल्हा व जिल्ह्याबाहेरील रुग्ण उपचारासाठी मोठया प्रमाणात दाखल होत आहेत. व्हेंटिलेटर व बेड न मिळाल्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्हेटिलेटर व बेडची संख्या वाढविणे गरजेचे आहे. तसेच 108 नंबरच्या अॅम्ब्युलन्सची संख्या केवळ दोन असल्यामुळे अत्यवस्थ रुग्ण सातारा येथे पाठविण्याकरिता रुग्णाला ताटकळत ठेवावे लागत आहे. दरम्यान वेळेत उपचार न मिळाल्यामुळे रुग्णाच्या जीवितास धोका संभवतो. या तिन्ही हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची सोय असल्यामुळे अजून 25 व्हेंटिलेटर बसवून वाढत्या अत्यवस्थ रुग्णांसाठी कराड येथेच रुग्णांवर उपचार करता येतील. त्यामुळे कराड, पाटण तालुक्यासह सांगली जिल्हयातील कडेगाव, शिराळा या तालुक्यातील रुग्णांची देखील सोय होईल.
प्राथ.आरोग्य केंद्र बामणोली (ता. जावली) अंतर्गत 1998 साली एकच तरंगता दवाखाना मंजूर आहे. त्यानुसार जावली व महाबळेश्वर तालुक्यातील 68 गावांना आरोग्य सुविधा पुरविण्यात येतात. महाबळेश्वर तालुक्यात असणा-या प्राथ.आरोग्य केंद्र तापोळा अंतर्गत गावांसाठी व कोयनानगर मधील कोयना जलाशयातील इतर गावासाठी वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी दोन तरंगती धन्वंतरी पथके मंजूर व्हावीत. महाबळेश्वर तालुक्यातील बहुतांशी गावे ही अतिशय दुर्गम असून या भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे. पावसाळ्यात दळणवळणास व रुग्णांना आरोग्य सेवा पुरविताना अडचणी निर्माण होतात. कोयना धरण परिसरातील अतिदुर्गम भागातील तसेच कांदाटी खो-यातील 16 गावे व वाडयांचा संपर्क कोयना जलाशयाची पातळी उंचविल्यानंतर महाबळेश्वर तालुक्याशी होत नाही. त्यामुळे रुग्णांना आवश्यक आरोग्य सेवा मिळण्यास विलंब होतो. कोयना जलाशया पलीकडील गावांना तात्काळ आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शिवसागर जलाशयात दोन मोटर बोट व स्कूटर अॅम्ब्युलन्स मंजूर व्हाव्यात जेणेकरुन पावसाळयात संपर्क न होणा-या गावातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य पथकास जाणे येणे सोयीचे होईल.
मारुल हवेली (ता.पाटण) हे गाव दुर्गम, डोंगराळ भागात आहे. या गावची लोकसंख्याही मोठी असून हे मध्यवर्ती ठिकाण पडत असल्याने परिसराच्या गावातील नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरु असते. मात्र रात्रीच्या वेळी रुग्णांना अत्यावश्यक आरोग्य सेवा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे खास बाब म्हणून येथे प्राथ. आरोग्य केंद्र येथे मंजूर करण्यात यावे. कुंभरोशी ( ता. महाबळेश्वर ), केंजळ ( ता. वाई ), जवळे ( ता.खंडाळा ), वडगाव ज.स्वा. ( ता. खटाव ), कुकुडवाडी ( ता. माण ) व अंबवडे ( ता. खटाव ) येथे प्राथ. आरोग्य पथके मंजूर आहेत. शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडील निर्णयानुसार दि 6 ऑगस्ट 2007 अन्वये आकृतीबंध दर्शविणेत आला आहे. सदर आकृतीबंधामध्ये प्राथ. आरोग्य पथकास वैद्यकीय अधिकारी वर्ग 2 ची 5 पदे, वैद्यकीय अधिकारी वर्ग 3 चे 1 पद व आरोग्य सेवक पुरुष व महिलाची 6 पदे मंजूर नाहीत. या सर्व पदांना मान्यता देण्यात यावी. अशा विविध मागण्या खा.श्रीनिवास पाटील यांनी केल्या आहेत.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |