09:05pm | Jan 21, 2023 |
सातारा : दिव्यांगांना भेडसावणार्या अनेक तक्रारींचा पाठपुरावा करीत असतानाही सातारा प्रशासन दिव्यांगांच्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत असल्याने दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय हणमंत पवार यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे सामुहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
अजय पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली आणि आपण अमृत महोत्सव धुम धडाक्यात सर्वांनी साजरा केला. तरी दिव्यांगांना न्याय मिळत नसला तर दिव्यांगांना जगण्याचा काही अर्थ नाही. दिव्यांगांच्या अनेक न्याय्य मागण्या आजपर्यंत सातारा प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. तरीही प्रशासन त्यावर कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे. यातील काही मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. सातारा जिल्ह्यातील तहसीलदार ऑफिस मध्ये टॉयलेट व बाथरूम ची महिला व दिव्यांगांसाठी सोय नाही, सातारा पंचायत समिती मध्ये दिव्यांगांसाठी बाथरूम टॉयलेटची सोय नाही, जिल्हाधिकारी कार्यालयाला लिफ्ट ची सोय नाही, पालिकेने सन 2013 पासून दिव्यांगांना 5 टक्के निधी केला आहे. पण सरकारी कर्मचार्यांना 1 लाख रुपये निधी दिला आहे. परंतू शासकीय अथवा अशासकीय नियुक्ती झालेल्या वा होणार्या कर्मचार्यांना सहाय्यक तांत्रिक उपकरणे उपलब्ध करुन देण्यासाठी 1 फेब्रुवारी 2021 च्या शासन निर्णय नुसार कर्मचारी सहाय्यक तंत्रज्ञान उपकरणे असा निधी देण्यात येतो. परंतु आपल्या सातारा नगरपालिका मधून 5% निधीतून देण्यात आला आहे. याची योग्य चोकशी होऊन संबंधित अधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या ऑफिसच्या शेजारी टॉयलेटची गरज असताना आतापर्यंत बांधून देण्यात आलेले नाही, सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये दिव्यांग कक्ष चालू करण्यात यावेत व तेथे दिव्यांगांना योग्य मार्गदर्शन करणात यावे, संजय गांधी निराधार पेन्शन मध्यवर्ती बँकेत कोणत्याही शाखेत कोणत्याही त्याच गावचा रहिवासी पाहिजे अशी अट असते परंतु असे न होता इथून पुढे कोणत्याही शाखेत दिव्यांग व्यक्तीला जिथे रॅम्प ची सोय नाही तिथे खाली येऊन सर्व कागदपत्रे द्यायची सोय करण्यात यावी, सातारा नगरपालिका हद्दीत टॉयलेटची सोय करण्यात आलेले असे आमच्या संस्थेला पत्र दिले आहे. परंतु एसटी स्टँड येथे दिव्यांग बाथरूम नाही असे संबंधित व्यक्ती प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला सांगून दहा रुपये घेतो आणि बाथरूमची चावी देत नाही. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, पोवई नाक्यावरील सायली हॉटेलमध्ये दिव्यांग व्यक्ती हरिभाऊ साळुंखे गेल्या दहा वर्षापासून काम करत आहेत. तरी त्यांना पीएफ आणि इएसआय चालू केला नाही. याप्रकरणी संबंधित हॉटेल मालकाला तशी समज देण्यात यावी, नवीन आरटीओ ऑफिस शेजारचा दिव्यांग झोन केला असताना एक वर्षापूर्वीच्या निवेदनावरील दहा दिव्यांग व्यक्तींना देण्यात यावा व त्या जागेतील इतर सक्षम व्यक्तींचे स्टॉल काढण्यात यावेत, पंतप्रधान आवास योजना योजनेतील घरकुल दिव्यांगाना प्रथम प्राधान्य देण्यात यावे. या सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करण्यात यावा. अन्यथा आम्ही सर्व दिव्यांग बांधव 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी सामूहिक आत्मदहन करणार आहोत. त्याला संबंधित विभाग जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर अजय हणमंत पवार, अमोल शंकर भातुसे, संतोष तुकाराम भोसले, अमोल प्रकाश निकम, पांडुरंग विठ्ठल शेलार, शैलेंद्र बबन बोर्डे, धर्मेंद्र पिलाजी कांबळे, गणेश बबन किर्दत, चंपाबाई क्षीरसागर, शोभा मोरे, हरिभाऊ बाबुराव साळुंखे, रविंद्र मधुकर गाडे, युवराज यशवंत गायकवाड, नितीन हणमंत शिंदे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दिव्यांग आयुक्तालय पुणे, सातारा पोलीस अधीक्षक, सातारा शहर पोलीस स्टेशन यांना पाठविण्यात आल्या आहेत.
युवकाचे अपहरण करून त्याचा खून केलेले संशयित 36 तासात रत्नागिरी येथून जेरबंद |
गर तू मेरा नही हो सका, तो किसी और का होने नहीं दूंगी... |
वाढे फाटा येथील मारेकरी ताब्यात; सूत्रधार कोण? |
दोन लाखांचे दागिने घेऊन कारागीर पळाला |
एकाची 35 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
टेस्टिंग सर्टिफिकेटच्या आमिषाने सुमारे 97 हजारांना गंडा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू |
दहावीतील मुलांनी धाक दाखवण्यासाठी चक्क क्लासमध्ये नेला कोयता |
राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा : पालकमंत्री शंभूराज देसाई |
हॉटेलमध्ये विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत |
रेशनिंग दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन |
कराडचा उड्डाणपूल पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील... |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
टेस्टिंग सर्टिफिकेटच्या आमिषाने सुमारे 97 हजारांना गंडा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू |
दहावीतील मुलांनी धाक दाखवण्यासाठी चक्क क्लासमध्ये नेला कोयता |
राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा : पालकमंत्री शंभूराज देसाई |
हॉटेलमध्ये विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत |
रेशनिंग दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन |
कराडचा उड्डाणपूल पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील... |
खानापूरच्या युवकाचा परखंदीत निर्घृण खून; वाई तालुक्यात खळबळ |
तांब्याच्या तारेची चोरी |
नोकरीच्या आमिषाने तब्बल चार लाख 99 हजाराची फसवणूक |
युवतीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल |
मध्यमवर्गीय, शेतकरी, गोरगरीबांना न्याय देणारा अर्थसंकल्प |