(प्रकाश राजेघाटगे)
बुध: श्री जानुबाई देवी हे राजापूर गावाचे ग्रामदैवत 250 वर्षापूर्वी श्री आंबोजी राजेघाटगे यांनी राजापूर गावाची रचना केली. तीन एकरात राजवाडा व एक ते दीड एकरात श्री जानुबाई देवीचे मंदिर सुंदर काळ्या पाषाणात बांधले. मंदिर अतिशय सुंदर व सुबक असून ते पाहावयास व श्री जानुबाई देवी भक्तांना पावणारी असल्याने भक्त दूर-दूरवरून देवीच्या दर्शनाला येतात. देवीचे मुळ स्थान कोकणातील असल्याने कडक देवस्थान आहे.
ज्या जंगलात ती प्रगट झाली व राजांना द्रष्टांत दिला ते स्थान राजापूरच्या उत्तरेला तीन कि.मी. अंतरावर आहे त्या स्थानाला आजही जानुबाई खिंड नावाने ओळखले जाते. आजही तेथून नागपंचमी व नवरात्री दसरा या सणाला देवीला पालखीत घालून आणले जाते व गावात वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते.
पूर्वीच्या काळी राजांच्या स्त्रियांना देवीच्या दर्शनासाठी जाण्या-येण्यासाठी राजवाड्यातून बांधीव भुयार मंदिरापर्यंत आहे एवढेच नव्हे तर बुध गावच्या राजवाड्यातून राजापूर येथील मंदिरापर्यंत भुयार आहे आणि बुध गावच्या राजवाड्यातील भुयाराच्या तोंडाशीच श्री जानुबाई देवीचे लहान मंदिर राजापूरच्या मंदिरातील पाषाणाचेच आहे. बुधच्या राजवाड्यात असे पाषाण कोठेही पाहावयास मिळत नाही फक्त ते राजापूर मध्येच पाहावयास मिळते.
मंदिराच्या पश्चिमेला मुख्य काळ्या पाषाणातील मुख्य द्वार कमान असून दक्षिणेकडे उपद्वार आहे. संपूर्ण मंदिरच काळ्या पाषाणाचे असून देवीचा गाभारा सुबक असून वर कळस आहे. देवीच्या मंदिरासमोरच श्री आंबोजी राजे यांची समाधी असून ती कलाकृती अद्भूत आहे व कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. शेजारीच तीस फूट उंचीची दिपमाळ असून नवरात्र व माघ पोर्णिमेला तिच्यावर दिप पेटविले जातात ते द्रश्य नयनरम्य असते.
माघ पोर्णिमेच्या तृतियेला देवीची वार्षिक मोठी यात्रा दरवर्षी भरते. महाराष्ट्रातून भरपूर भाविक यात्रेदरम्यान देवीच्या दर्शनाला येतात. मंदिराच्या पश्चिम मुख्य द्वारावर वेस असून पायर्याने त्यावर चढून जाऊन गावचा सुंदर नजारा प्रत्येकजण पाहू शकतो आणि विशेष म्हणजे मंदिरात चारशे वर्षापूर्वीचा अवाढव्य असा वटवृक्ष आहे. जो पाच किलोमीटर अंतरावरून सुद्धा प्रत्यक्ष डोळ्याने पाहू शकता असा महाकाय वटवृक्ष आजही श्री जानुबाई देवीच्या मंदिरात पाहू शकता.
आजही देवीला जो मनोभावे पूजतो. त्याच्या सर्व आशा-आकांक्षा पूर्ण होतात. असा सर्व भक्तांना अनुभव आहे. देवीच्या नवरात्र उत्सवात नऊ दिवस बुध, फलटण आदी ठिकाणचे गोंधळी येवून नऊ दिवस देवीचा जागर करतात व दांडियापण नवीन पिढी खेळत असते.
असे हे जागृत देवस्थान राजापूर (ता.खटाव, जि.सातारा) येथे पाहावयास मिळते. सातार्यापासून 35 कि.मी. अंतरावर व सेवागिरी महाराजांच्या पुसेगाव नगरीपासून उत्तरेला नऊ कि.मी. अंतरावर बुध पंचक्रोशीतील राजापूर हे टुमदार गाव, निसर्गाच्या सानिध्यात वसलेले व श्री जानुबाई देवीच्या भक्तीने व श्री आंबोजी राजाच्या पदस्पर्शाने पावन झालेले गाव. राजापूरला प्रत्येकांनी भेट द्यावी व देवीच्या दर्शनाने आपले मन व तन पवित्र होते असा येथील भक्तांना स्वानुभव आहे.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |