बुध : सातारा जिल्हा परिषद, सातारा शिक्षण विभागाचे वतीने आयोजित सावित्रीबाई फुले चित्रकला स्पर्धा-सन 20/21 या शैक्षणिक वर्षातील स्पर्धेत फलटण पंचायत समिती फलटण तालुका स्तरावरील चित्रकला स्पर्धेत आरडगांव केंद्रातील जिल्हा परिषद शाळा सासवड मधील इयत्ता तिसरीत शिकणारी कुमारी यशदा अविनाश गायकवाड हिने इयत्ता पहिली ते पाचवी या लहान गटात प्रथम क्रमांकावर विराजमान होण्याचा बहुमान पटकावला आहे. तर गिरवी केंद्रातील जिल्हा परिषद शाळा निरगुडी मधील इयत्ता पाचवीत शिकत असलेली कुमारी प्रणाली आप्पासाहेब मदने हिने तिसरा क्रमांक मिळवत सुयश संपादन केले आहे.
इयत्ता सहावी ते आठवी या मोठ्या गटातील चित्रकला स्पर्धेत आरडगांव केंद्रातील जिल्हा परिषद शाळा, हिंगणगाव येथील इयत्ता सातवीमध्ये शिकणारी कुमारी तनिष्का रविंद्र भोईटे हिने तिसरा क्रमांक संपादन करुन सुयश संपादन केले आहे.
या कौतुकास्पद व प्रेरणादायी यशाबद्दल केंद्रप्रमुख अनिल बुवासाहेब कदम यांनी सांगितले की, आरडगांव व गिरवी केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षक, पालक, विद्यार्थी, विविध शैक्षणिक उपक्रमामधून व स्पर्धा मधून सहभागी होऊन सुयश संपादन करत आहेत. ही बाब कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे. कोविड-19 कालावधीतील ऑनलाईन स्पर्धेत मिळालेले यश प्रेरणादायी व उल्लेखनीय आहे.
आरडगांव व गिरवी केंद्रातील चित्रकला स्पर्धेत मिळालेले सुयशा बद्दल महाराष्ट्र राज्य विधानपरिषद सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजिवराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट, सातारा जिल्हा परिषद सदस्य जिजामाला नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समिती फलटण सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर निंबाळकर, फलटण पंचायत समिती फलटणचे गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल संकपाळ, चन्नया मठपती, केंद्रप्रमुख अनिल कदम यांनी अभिनंदन केले आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |