12:18pm | Oct 19, 2021 |
पाटण : माजगाव (ता. पाटण) येथे पती-पत्नीच्या घरगुती भांडणातून पतीने स्वतःचे घर पेटविल्याने शेजारील नऊ घरांना भीषण आग लागली. ही घटना सायंकाळी घडली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने दहा घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य, दागिने, रोख रक्कम, शेतीची औजारे जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या अगीत अंदाजे 50 लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक माहितीत समजत आहे. या प्रकरणी संजय पाटील यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, माजगाव येथील संजय रामचंद्र पाटील व त्याची पत्नी पालवी यांचे घरगुती भांडण दिवसभर सुरू होते. या भांडणातून संजय पाटील याने स्वत:च्या राहत्या घराला आग लावली. त्यामध्ये घरातील दोन गॅस सिलेंडरने पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे शेजारील पांडुरंग पाटील, ज्ञानदेव पाटील, संभाजी पाटील, चंद्रकांत पाटील, भीमराव पाटील, दत्तात्रय पाटील, कृष्णात पाटील, पंढरीनाथ पाटील, गोरखनाथ पाटील व आनंदराव पाटील यांच्या 10 घरांना भीषण आग लागली.
घटनेची माहिती मिळताच पाटण तालुका खरेदी विक्री संघ, सह्याद्री सहकारी साखर कारखाना व जयवंत शुगर यांच्या अग्निशामक पथकाला पाचारण केले होते. आगीची माहिती मिळताच सरपंच प्रमोद पाटील, मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, पोलीस शास्त्राचे सिद्धांत शेडगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. याप्रकरणी संजय पाटील यास मल्हारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |