02:55pm | Apr 28, 2022 |
नांदेड : मधुमेह असलेल्या रूग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. मधुमेहाची लागण होण्याची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये मुख्य म्हणजे खराब जीवनशैली. मधुमेह ही भारतासाठी अत्यंत धोकादायक घंटा आहे, कारण मधुमेहाच्या रूग्णांची संख्या विशेष करून भारतामध्ये झपाट्याने वाढताना दिसते आहे. सध्या जगामध्ये सर्वाधिक मधुमेहाचे रूग्ण हे चीनमध्ये आहेत. मात्र, भारतामधील मधुमेहाची संख्या वाढतच आहे. मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक औषध बाजारामध्ये उपलब्ध आहेत, तसेच मधुमेहावर वेगवेगळे संशोधन केले जाते. नुकताच नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील औषधनिर्माणशास्त्र संकुलात मधुमेहावर एक प्रभावी औषध शोधण्यात आले आहे.
औषध निर्माणशास्त्र संकुलामध्ये केले संशोधन
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील औषधनिर्माणशास्त्र संकुलामधील प्रो. शैलेश वढेर आणि त्यांच्या टीमने मधुमेह बरा होण्यासाठी एक शोध लावला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना पेटंट मिळाले आहे. हे औषध अगदी माफक दरामध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अगदी सामान्य रुग्णांना हे परवडणारे आहे. यामुळे आता मराठवाड्यातील मधुमेहाच्या रूग्णांचे टेन्शन कमी होणार आहे. आजकाल मधुमेह हा सामान्य विकार झाला आहे.
कॅनाग्लीफ्लोझिन नॅनोस्ट्रक्चर्ड हे मधुमेह विरोधी औषध आहे. व्यावसायिक दृष्ट्या कॅनाग्लीफ्लोझिन नॅनोस्ट्रक्चर्ड लिपीड खूप महाग आहे. यासाठी कॅनाग्लीफ्लोझिन नॅनोस्ट्रक्चर्डचे प्रो. शैलेश वढेर यांच्या टीमने तयार केले आहे.
मधुमेहावरील प्रभावी अत्यंत औषध कॅनाग्लीफ्लोझिन नॅनोस्ट्रक्चर्ड लिपीड वाहक सामान्य पाण्यात विरघळणारे औषध आहे. कॅनाग्लीफ्लोझिन नॅनोस्ट्रक्चर्डची विद्राव्यता आणि जैवविविधता वाढविण्यासाठी डिझाईन तयार करण्यात आलेले आहे.
यासाठी प्रो. शैलेश वढेर यांच्या टीममध्ये डॉ. सुरेंद्र गट्टाणी, आणि डॉ. श्रद्धा एस. तिवारी यांचा समावेश आहे. या त्यांच्या अतुलनीय यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्र सिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे, नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य विभागाचे संचालक डॉ. राजाराम माने यांनी डॉ. शैलेश वढेर व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.
छत्रपती शिवाजी कॉलेजची एन सी सी कॅडेट गार्गी थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना |
भा ज पा सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न |
साताऱ्यासह पश्चिम भागात पाऊस |
आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्या वाचवा! |
कोंडवे येथील एका शाळकरी मुलाची आत्महत्या |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
एमडीआरटी सल्लागारांच्या क्रमवारीत टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी |
महालक्ष्मीच्या आरतीसाठी सोळा दिवे आणि 56 भोग |
बेडग ते मंत्रालय लॉंग मार्च आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी साताऱ्यात मान्यवरांची भेट |
व्यवहारातील संवेदना समजावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवे |
बेडग येथील कमान प्रकरणाचा रिपाईद्वारे साखळी मोर्चा काढून निषेध |