03:04pm | Feb 24, 2021 |
सातारा: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातात, समाजाच्या सर्व घटकातील विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने शासनाने विविध शिष्यवृत्ती योजना राबवलेल्या असून त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे यांनी केले.
सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्ती विभाग, विशेष स्थायी समिती, बी.सी.सेल व शिष्यवृत्ती कार्यालयीन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज मार्गदर्शन कार्यशाळेला मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.मेनकुदळे बोलत होते. यावेळी सातारा समाजकल्याण विभागातील गणेश अतकरे व महाविद्यालयीन शिष्यवृत्ती विभागाचे नोडल ऑफिसर प्रा.डॉ.गजानन भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेस समाज कल्याण विभाग, सातारा यांच्यावतीने गणेश अतकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी समाजातील विविध घटकांच्यासाठी तसेच महिला वर्गासाठी असलेल्या अनेक शिष्यवृत्ती योजनांची माहिती अतकरे यांनी दिली. शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे, कागदपत्रांची पूर्तता करणे, आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक लिंक करणे आदी गोष्टी अतकरे यांनी समजावून सांगितल्या. शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनीही जागरूक असणे गरजेचे आहे असे मत या वेळी अतकरे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ.गजानन भोसले यांनी करून दिला. नॅक समन्वयक डॉ.जयश्री आफळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख प्रा. घनश्याम गिरी यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.अभिजीत फटे यांनी तंत्रसहाय्य केले. मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा.दिलीप पवार यांनी आभार मानले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |