11:55am | Aug 08, 2021 |
शेबर्गन : अफगाणिस्तानच्या वायू सेनेने केलेल्या हवाई हल्ल्यात २०० पेक्षा जास्त तालिबान दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. अफगाणिस्तानच्या सुरक्षा मंत्रालयाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तालिबानला मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागलं, जेव्हा वायू सेनेने शेबर्गन शहरात त्यांच्या एकत्र येण्याच्या ठिकाणांना लक्ष्य केले. या हल्ल्यात २०० पेक्षा जास्त तालिबान सदस्यांचा खात्मा झाला.
अफगाणिस्तान सुरक्षा मंत्रालयाचे अधिकारी फवाद अमान यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती देताना सांगितले, "आज सायंकाळी वायु सेनेकडून त्यांच्या सभा व लपून बसण्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर, शेबर्गन शहरात २०० पेक्षा अधिक तालिबान दहशतवादी मारले गेले. हवाई हल्ल्यामुळे मोठ्यासंख्येने त्यांचा शस्त्रसाठा व दारूगोळा तसेच त्यांची १०० पेक्षा अधिक वाहन नष्ट झाली.”
जावजान प्रांताच्या शेबर्गन शहरातील तालिबानच्या जमावाला आज सायंकाळी बी-52 बॉम्बरने निशाणा बनवलं गेलं, अशी माहिती देखील काल अफगाणिस्तानच्या सुरक्षा मंत्रालयातील अधिकाऱ्याने ट्विटद्वारे दिली होती.
तालिबानच्या जमावाला सायंकाळी साडेसहा वाजता शेबर्गन शहर, जोज्जान प्रांतात बी-52 द्वारे लक्ष्य करण्यात आलं होतं. अमेरिकेच्या वायुसेनेच्या हवाई हल्ल्यामुळे दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले आहे. असं अफगाणिस्तानच्या सुरक्षा मंत्रालयातील अधिकाऱ्याने ट्विट केलं आहे.
या अगोदर एका पाकिस्तानी दहशतवाद्यास गझनी प्रांतीय केंद्राबाहेरील भागात अफगाणिस्तानच्या कमांडो दलाकडून अटक करण्यात आली होती. त्याचा दहशतवादी कारवाया आणि नागरिकांच्या हत्यांमध्ये सहभाग होता.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |