10:57pm | May 24, 2023 |
सातारा : खंडाळा तालुक्यातील बोरी येथे दि. 23 रोजी सकाळी 10.30 वाजता रहायचे नाही याच कारणावरुन दोन गटात हाणामारीची घटना घडली. यामध्ये दोन गाडयांचे नुकसान करण्यात आले असून त्यामध्ये परस्पर विरोधात लोणंद पोलीस ठाण्यात 9 जणांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका गटाकडून चौघांवर तर दुसऱया गटाकडून पाच जणांवर गुन्हा दाखल केलेले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लक्ष्मण शांताराम शिकरे (वय 24) याने दिलेल्या फिर्यादीवरुन अवधूत बळवंत मोरे, सुनीता बळवंत मोरे (दोघे रा. बोरी), अनिल धोंडीराम डोईफोडे, अभिजित अनिल डोईफोडे, अंकित अनिल डोईफोडे(सर्व रा. खंडाळा) यांनी घराच्या दरवाजावर दगडे मारुन तुम्ही येथे रहायचे नाही. तुम्ही निघून जा अशी दमदाटी करत अंकित डोईफोडे याने कृष्णा याच्या चेहऱयावर स्प्रे मारला तर अभिजित हा कुऱहाडीने मारत असताना शिकरे याच्या डाव्या पायावर बसल्याने जखमी झाला. तसेच अनिलने लाकडी दांडक्याने शिकरेला आणि कृष्णाला मारहाण केली. याचा तपास हवालदार कुंभार करत आहेत. तसेच सुनीता बळवंत मोरे (वय 40) हिने दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मण शांताराम शिकरे, कृष्णा शांताराम शिकरे, हर्षदा लक्ष्मण शिकरे, प्रियांका कृष्णा शिकरे यांनी तू येथे रहायचे नाही असे म्हणत धक्काबुक्की केली. लक्ष्मण शिकरे याने सुनीता मोरे हिचे भाचे अंकीत आणि अभिजित यांच्या डोळय़ात मिरचीची पुड टाकून हातात दगड घेवून अभिजितच्या डोक्यात मारुन जखमी केले. तर अंकितला खाली पाडून पायावर लोखंडी पट्टीने मारहाण वरुन जखमी केले. हर्षदा शिकरे आणि प्रियांका शिकरे या दोघींनी हाताबुक्यांनी सुनीता हिला मारहाण केली. तसेच त्यांनी मारुती कार आणि दुचाकीवर दगडे मारुन नुकसान केले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |