08:33pm | Jun 02, 2021 |
वाई : वाई पालिकेमध्ये मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी काही नगरसेवकांशी हात मिळवणी करून विकासकामात राजकारण करत जनतेच्या पैशाचा अपव्यय केल्याचा आरोप उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी केला आहे. याबाबतची तक्रार त्यांनी अप्पर सचिव नगर विकास मंत्रालयाकडे केली आहे.
प्रशासकीय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी यांनी नागरी हितासाठी कोणतेही काम न करता नगराध्यक्षांशी हातमिळवणी करून अनेक गैर प्रकार केलेले आहेत. पालिकेचे तीन लाखाच्या पुढील टेंडर व त्यांचे इस्टिमेट असेल तर त्याचे ऑनलाईन टेंडर काढणे अपेक्षित असताना संबंधितांनी नगरसेवकांना हाताशी धरून बोगस ठराव पारित करून विषय मंजूर करून घेतले आहेत.
वास्तुविशारद यांच्या कामाबाबत अधिकाऱ्याने कायदेशीर मर्यादा ओलांडून फीचा मोबदला देण्यात आला आहे. बेकायदेशीर कार्यालयीन आदेश पारित करून सुमारे सत्तर लाख रुपयांचे बिल मेहनताना म्हणून अदा केले आहे. वास्तविक शासन निर्णयाप्रमाणे दोन टक्के मेहनताना अदा करावा असा शासन निर्णय असताना पाच टक्के फी देण्याचा ठराव केला. यामध्ये तीनच विकास कामे समाविष्ट असताना नवीन पुल बांधकामाचा निधी प्राप्त झाल्यानंतर त्याचा समावेश जानेवारीच्या ठरावात केला. त्यांनी जुन्या ठरावात शाळा क्रमांक चारचा निधी थांबविण्यात आलेला असताना देखील त्या कामात समावेश केरून गैरव्यवहार केला आहे. अंदाजित रकमेच्या तब्बल पाच टक्के दर मंजूर करून जनतेच्या पैशाची लूट केली आहे. पुढील बिलाची रक्कम अदा होऊ नये यासाठी तातडीने कार्यवाही व्हावी. मुख्याधिकार्यांनी केलेले चुकीचे आदेश तातडीने रद्द व्हावेत. या प्रकल्पांमध्ये मुख्याधिकार्यांनी सर्व प्रकल्पाची जबाबदारी एकास न देता दोन स्वतंत्र कन्सल्टंट नेमून सुमारे सात टक्के दराने दोन कोटी ३८ लाख रुपयांची रक्कम मेहताना दाखवून जनतेचा पैसा वाया घालण्याचा घाट घातला आहे. यास आळा घालणे गरजेचे आहे.
मुख्याधिकार्यांनी आरोग्य विभागाकडील पालिका हद्दीत जंतुनाशक फवारणी घरोघरी जाऊन करण्याच्या कामामध्ये वर्तमानपत्रांमध्ये ई-निविदा सूचना प्रसिद्ध केली, असे खोटे दाखवून स्थायी समितीची मंजुरी घेऊन मक्तेदारास बिल अदा केले आहे. या कामामध्येही त्यांनी गैर कारभार केला आहे. मुख्याधिकारी व संबंधित पदाधिकारी त्यांच्या बाबतच्या तक्रारी गंभीर स्वरूपाचे असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी नगर विकास विभागाचे अपर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांच्याकडे केली आहे.
आर्कीटेक्ट आणि कन्सल्टंट या दोन भिन्न तांत्रिक बाबी आहेत. आर्कीटेक्टची नियुक्ती वास्तुविशारद अधिनियमाद्वारे शासन निर्णय आहे त्यानुसारच केली जाते. यात त्यांचे काम आणि दर यांची स्पर्धात्मक तुलना करून सर्वसाधारण सभेने एकमताने पाच टक्के हा दर ठरवून दिलेला आहे. त्याचे काम डिझाइन करणे आणि त्याला सक्षम प्राधिकरणाकडून तांत्रिक मंजूरी घेणे एवढेच आहे. सदर ठराव एक वर्षापूर्वी झाला असून त्यानुसार त्याचे काम पूर्ण झाले आहे. सभेमधे एकूण २३ जणांनी केलेला ठराव बदलण्याचा अधिकार मुख्याधिका-यांना नाही. त्यावर इतर सदस्य व अध्यक्ष यांच्या सह्या असतात, प्रोसिडींग असते. ते सर्वच चुकीचे कसे असू शकते. तोच विषय जंतुनाशक ठरावाचा देखील आहे. एकदा दर निश्चित झाल्यानंतर, काम पूर्ण झाल्यावर, बिले थांबवण्याचे काहीही कारण राहत नाही. नगरपालिका अधिनियमास अनुसरूनच सर्व कामकाज केले असल्याने या प्रकारच्या आरोपांना काही अर्थ नाही.
- विद्या पोळ, मुख्याधिकारी, वाई पालिका.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |