02:44pm | Oct 10, 2020 |
हिस्सार: दीड कोटी रूपयांच्या विम्यासाठी स्वत:च्या हत्येचा बनाव करण्याच्या डाव पोलिसांनी उधळून लावला. हरियाणातील हिस्सार जिल्ह्यात एका जळालेल्या कारमध्ये कथितरित्या व्यापार्याचा मृतदेह सापडल्याने मंगळवारी खळबळ उडाली होती. शहरात याच जळितकांडाची चर्चा सुरू होती. पण या घटनेनंतर तिसर्याच दिवशी तो व्यापारी जिवंत सापडला आणि कोट्यावधींचा घोटाळा उघडकीस आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे, की मंगळवारी रात्री उशीरा राम मनोहर नावाच्या एका व्यापाराचा मृतदेह एका जळालेल्या कारमध्ये सापडला. राम मनोहरने शेवटचा कॉल आपल्या कुटुंबियांना केला होता. यामध्ये माझा जीव धोक्यात असून दोन बाइकस्वार मला मारून टाकतील. कुटुंबियांनी याची माहिती पोलिसांना दिली.
पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना जळालेल्या कारमध्ये पूर्णपणे भाजलेला मृतदेह सापडला. दुसर्या दिवशी सर्वत्र बातमी आली की राम मनोहर नावाच्या एका व्यापार्याकडून 11 लाख रुपये लुटले आणि त्याची हत्या करण्यात आली. पण, प्रत्यक्षात कहाणी वेगळीच होती. ज्या राम मनोहरच्या हत्येची चर्चा हिस्सार आणि हरियाणात होती तो शुक्रवारी 1300 किमी दूर छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये जिवंत सापडला. याच ठिकाणी पोलिसांनी त्याला अटक करून हिस्सार जिल्ह्यात आणले. एका कॉल डीटेलमुळे त्याचे बिंग फुटले. राम मनोहर मृत्यूचा तपास करताना पोलिसांनी त्याचे कॉल डीटेल्स काढले. त्यामध्ये तो एका महिलेच्या संपर्कात होता असे समजले. तिच्यावरच पाळत ठेवून पोलिसांनी रामम मनोहरचा पत्ता लावला. सविस्तर तपासात समोर आले की राम मनोहरच्या डोक्यावर कर्ज होते आणि त्याने काही दिवसांपूर्वी 1 कोटी 60 लाख रुपयांचा विमा काढला होता.
कथित हत्येती माहिती मिळताच फॉरेंसिक एक्सपर्ट डॉ. अजय यांच्या नेतृत्वात एक टीम घटनास्थळी पोहोचली होती. त्यांनी पोलिसांनी त्याच क्षणी सांगितले की ही हत्या नसून एक ड्रामा असल्याचा भास होत आहे. कारला हँडब्रेक वापरून थांबवले होते. असे कुणीही कार सहज पार्क करतानाच करत असते. लूट झाली असती तर कार रस्त्यात उभी असती. पण, घटनास्थळी कार रस्त्याच्या एका बाजूला उभी होती. बळजबरी थांबवल्यास सहजासहजी कुणीही हँडब्रेक लावून गाडी रस्त्याच्या एका बाजूला उभी करणार नाही.
ड्रायव्हरच्या बाजूची सीट मागच्या बाजूला खूप वाकलेली होती. यातून कटकारस्थान एका दुसर्या ठिकाणी आणि घटना एका दुसर्या ठिकाणी घडल्याचे दिसते. एखाद्या अवैध संबंध, विमा घोटाळा किंवा इतर काही कारणास्तव हा बनाव केला असावा असे तज्ज्ञांनी त्याच दिवशी सांगितले होते.
कारला बाहेरून आणि आतून दोन्ही ठिकाणी केमिकल ओतून आग लावण्यात आली होती. एकूणच परिस्थिती पाहता हा अपघात नसून एक कट रचून मुद्दाम केलेला ड्रामा असल्याचे एक्सपर्ट्सच्या निदर्शनास आले होते. येथूनच पोलिसांनी कॉल डीटेल्स काढले. घटनेच्या वेळी ती महिला सुद्धा राम मनोहरसोबत घटनास्थळी होती असे निदर्शनास आले. कसून चौकशी केली असता संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |