11:01pm | Oct 15, 2020 |
सातारा : गुरुवारी जिल्ह्यात 271 बाधितांची नोंद, तर 9 बाधितांचा मृत्यू झाला. तसेच 276 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला असून 379 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
जिल्ह्यात 9 बाधितांचा उपचारादरम्यन मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबळींच्या आकडेवारीने गुरुवारी चौदाशे चा आकडा पार करीत 1 हजार 408 वर मजल मारली आहे. तर, गुरुवारी 271 बाधितांची नोंद झाल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 42 हजार 969 वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विविध रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 276 नागरिकांना कोरोनातून ठणठणीत बरे झाल्याने घरी सोडण्यात आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या 34 हजार 774 वर पोहोचली असून 379 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
9 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या शाहुपरी येथील 74 वर्षीय महिला, वडूज ता. खटाव येथील 76 वर्षीय महिला, वर्ये ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, खेड नांदगिरी ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये झिरपवाडी ता. फलटण येथील 82 वर्षीय पुरुष, करवडी ता. कराड येथील 63 वर्षीय महिला. तर रात्री उशिरा कळविलेले राजसपुरा ता. सातारा 67 वर्षीय पुरुष, बेलवडे ता. कराड येथील 67 वर्षीय महिला, कोरेगाव येथील 45 वर्षीय महिला अशा एकूण 9 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
379 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 75, कराड येथील 16, फलटण येथील 8, कोरेगाव येथील 60, वाई येथील 29, खंडाळा येथील 12, रायगाव येथील 30, पानमळेवाडी येथील 51, मायणी येथील 15, महाबळेश्वर येथील 6, खावली येथील 21 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 56 असे एकूण 379 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |