सातारा : संचारबंदीच्या काळात वृत्तपत्रे ही अत्यावश्यक सेवेत मोडत असतानाही सातारा शहरात स्टॉलवर पेपर विक्री करण्यास मनाई करण्यात आली होती. पोलिसांनी शनिवारी सकाळी पेपर विक्रेत्यांना स्टॉल्स बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर सातारा जिल्हा पत्रकार संघाने जिल्हा वृत्तपत्रांच्या प्रमुखांना घेवून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी स्टॉलवर पेपर विक्री करण्यास लेखी परवानगी दिली.
संचारबंदीच्या काळात वृत्तपत्रांना घरपोच वितरणास परवानगी दिली आहे. मात्र, आदेशामध्ये संदिग्धता असल्याने व स्टॉलवर विक्री करण्याबाबत कोणताच लेखी आदेश नसल्याने सातार्यातील सर्वच दुकानांवर शनिवारी कारवाईची प्रक्रिया सुरू होती. पोवई नाक्यावर तसेच मोती चौकात वृत्तपत्रांचेही स्टॉल्स आहेत. दुकानांवर केलेल्या कारवाईप्रमाणेच वृत्तपत्रांच्या स्टॉलवरही पोलिस अधिकार्यांनी कारवाई सुरू केली होती. एका पेपर विक्रेत्याला तर पोलिस ठाण्यातच नेण्यात आले होते. तर दुसर्या अंक विक्रेत्यावर दंडाची प्रक्रिया सुरू केली होती. ही बाब पेपर विक्रेत्यांनी लक्षात आणून देताच सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व दै. पुढारीचे वृत्तसंपादक हरीष पाटणे, दै. पुढारीचे ब्युरो मॅनेजर जीवनधर चव्हाण यांनी जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल, सातारा उपविभागीय पोलिस अधिकारी आंचल दलाल फोन लावून पेपर विक्रेत्यांवर कारवाई करू नये, पेपर विक्रेते अत्यावश्यक सेवेत मोडतात असे सांगितले. या संदर्भात आपण जिल्हाधिकार्यांशी चर्चा करावी, अशा सूचना जिल्हा पोलिस प्रमुखांनी दिल्यानंतर जिल्हा पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने तातडीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालयात जावून चर्चा केली. वृत्तपत्राचे कामकाज कसे चालते त्यात पेपर विक्रेते व स्टॉल्स यांची भूमिका काय आहे, हे जिल्हाधिकार्यांना पटवून देण्यात आले. जिल्हाधिकार्यांनाही हे म्हणणे पटले आणि त्यांनी तातडीने जुन्या आदेशात दुरूस्ती करून सातारा जिल्ह्यात स्टॉलवर पेपर विक्री करण्यास लेखी परवानगी दिली. मात्र, त्याचवेळी स्टॉलवर उभे राहून वृत्तपत्र वाचू नये, असेही आदेशात म्हटले आहे. यावेळी दीपक प्रभावळकर, विनोद कुलकर्णी, राजेश सोळस्कर, जयंत काटे, संतोष भोगशेट्टी यांच्यासह विविध वृत्तपत्रांचे प्रमुख उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |