12:58pm | Oct 19, 2022 |
दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ( BCCI) वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी मुंबईत पार पडली आणि त्याचे चटके दूर पाकिस्तानला बसले. BCCIच्या या बैठकीत भारतीय संघाच्या आगामी दौऱ्यांबाबत चर्चा करण्यात आली आणि त्यात २०२३मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेबाबतही विचारमंथन झालं.
BCCI सचिव जय शाह यांनी बैठकीनंतर भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचे जाहीर केले आणि ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवण्यात यावी अशी मागणी केली. यानंतर पाकिस्तानचे आजी-माजी खेळाडू, पत्रकार सारेच खवळले आणि BCCIला धमकी देऊ लागलेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशियाई क्रिकेट परिषदेला सदस्यत्व सोडण्याची धमकी देऊन BCCIवर दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. PCBच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने तर थेट भारतात २०२३ मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकीच दिली. जय शाह यांच्या घोषणेनंतर PCBच्या अधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावली. त्यात BCCIच्या निर्णयावर टीका केली गेली. २०१२ पासून दोन्ही देशांमध्ये मालिका झालेली नाही. २००८मध्ये भारताने आशिया चषक स्पर्धेसाठी शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. ''PCB आता कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ICC आणि ACC यांनाही हे माहित्येय की पाकिस्तानने भारताता होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतल्यास त्यांचेच नुकसान आहे,''असे PCBच्या अधिकाऱ्याने PTI ला सांगितले.
''या पलिकडे मी जास्त काही बोलू इच्छित नाही, परंतु आम्ही हा मुद्दा पुढील महिन्यात मेलबर्न येथे होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत उपस्थित करणार आहोत,''असेही तो म्हणाला. PCB चेअरमन रमीझ राजा आणि अन्य अधिकारीही प्रचंड नाराज असल्याची चर्चा आहे. "पीसीबीचे अधिकारी जय शाहच्या विधानाच्या निर्णयाने आश्चर्यचकित झाले आहेत, कारण सप्टेंबर २०२३ मध्ये पाकिस्तानमध्ये आशिया चषक होणार आहे आणि जवळपास एक वर्ष बाकी आहे. जय शाह यांनी आशियाच क्रिकेट परिषद आशिया चषक पाकिस्तानातून यूएई येथे खेळवण्याचे विधान केले असेल, तर त्यांना सांगू इच्छितो की ही स्पर्धा पाकिस्तानात व्हावी हा ACC कार्यकारिणी सदस्यांचा निर्णय आहे, अध्यक्षांचा नव्हे.''असेही सूत्रांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी कॉलेजची एन सी सी कॅडेट गार्गी थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना |
भा ज पा सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न |
साताऱ्यासह पश्चिम भागात पाऊस |
आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्या वाचवा! |
कोंडवे येथील एका शाळकरी मुलाची आत्महत्या |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
एमडीआरटी सल्लागारांच्या क्रमवारीत टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी |
महालक्ष्मीच्या आरतीसाठी सोळा दिवे आणि 56 भोग |
बेडग ते मंत्रालय लॉंग मार्च आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी साताऱ्यात मान्यवरांची भेट |
व्यवहारातील संवेदना समजावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवे |
बेडग येथील कमान प्रकरणाचा रिपाईद्वारे साखळी मोर्चा काढून निषेध |