08:35pm | Apr 14, 2021 |
सातारा : सालपे (ता.फलटण) गावच्या हद्दीत वाठार ते लोणंद जाणार्या मार्गावर घडलेला दरोड्याचा गुन्हा 24 तासांच्या आत उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखा व लोणंद पोलिसांच्या पथकाने संयुक्तरित्या केलेल्या या कारवाईत गुन्ह्यातील सर्व आरोपी जेरबंद करण्यात आले असून सुमारे 15 लाख रूपये किमतीचा मुद्देमाल हस्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सतिश विष्णू माळी (वय 25 वर्षे), सुनिल ढाकाप्पा कदम (वय 22 वर्षे, दोघेही,रा. एमआयडीसी कुपवाड, कापसे प्लॉट मूळ. रा. कवलापूर, ता.मिरज, जि.सांगली), सौरभ सुधाकर झेंडे (वय 20 वर्षे), आकाश शैलेंद्र खाडे (वय 23 वर्षे, दोघेही रा. कवलापूर, ता.मिरज, जि.सांगली), संग्राम राजेश माने (वय 23 वर्षे, रा.बोरगांव, ता.कवठेमहांकाळ, जि.सांगली), गुरूप्रसाद सुदाम नाईक (वय 21 वर्षे, रा.गंजीखाना रोड, कवलापूर, ता.मिरज, जि.सांगल), सुशांत रमेश कांबळे (वय 30 वर्षे, रा.बौध्दवस्ती, कवलापूर, ता.मिरज, जि.सांगली), ज्ञानेश्वर दत्तात्रय पवळ (वय 19 वर्षे, रा.विठ्ठलमंदिरजवळ, कवलापूर, ता.मिरज, जि.सांगली), प्रतिक कुमार नलवडे (वय 19 वर्षे, रा.19 वर्षे, रा.कवलापूर ता.मिरज, जि.सांगली), विजय संभाजी चौगुले (वय 21 वर्षे, रा.संजयनगर, ता.जि.सांगली), किरण राजाराम माळी (वय 23 वर्षे, रा.दत्तमाळ, कवलापूर, ता.मिरज, जि.सांगली) अशी या दरोड्याच्या गुन्हात ताब्यांत घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मौजे सालपे (ता.ङ्गलटण, जि.सातारा) गावचे हद्दीत वाठार ते लोणंद जाणारे रोडवरील सालपे घाटातील वळणावर दि.13 एप्रिल 2021 रोजी पहाटे 04.30 वा.च्या सुमारास 20 ते 25 वयोगटातील अज्ञात 7 ते 8 जणांनी अशोक लेलंड कंपनीचा मालट्रक (क्र. एम.एच.12 एचडी/4892) ट्रक आडवा मारुन मालट्रक क्र.एम.एच.12 एचडी/4892 मधील चालक व त्याच्या सोबतच्या इसमाचे हात दोरीने बांधून त्यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्यांच्या जवळील मोबाईल ङ्गोन व रोख रक्कम तसेच त्यांचे कब्जातील मालट्रक क्रमांक एम.एच.12 एचडी/4892 व त्यामधील लोखंडी कास्टींगचे माल असा एकूण 14,59,300/- रूपये किमतीचा माल जबरीने घेवुन चालक व त्याचे सोबतच्या इसमास आरोपींच्या ताब्यातील विना नंबरच्या अशोक लेलंड कंपनीच्या मालट्रक मध्ये टाकुन नांदल (ता.ङ्गलटण) गावच्या हद्दीत सोडून निघून गेले. याबाबत भाऊसाहेब जिजाबा शिंदे (वय 32 वर्षे, रा.बाबुळसर खुर्द,जि.पुणे) यांनी लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुरनं 111/2021 भादंवि कलम 395,364,341,506 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नमुद गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून सदर गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेवून गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने ङ्गलटन उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, किशोर धुमाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख यांच्या अधिपत्याखाली 5 वेगवेगळी तपास पथके तयार करुन त्यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे तपास पथकांनी घटनास्थळापासून जाणार्या सर्व मार्गावरील सी.सी.टी.व्ही ङ्गुटेज तपासले तसेच ङ्गिर्यादी व त्याचे सोबत सांगली येथून आलेला इसम यांचेकडे गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांच्या हकीगतीमध्ये विसंगती दिसून आली त्यामध्ये ङ्गिर्यादीसोबत आलेला इसम हा काहीतरी खोटे बोलत असल्याचे जाणवले, म्हणून त्याचेकडे विचारपुस तंत्राचा वापर करुन अधिक सखोल विचारपुस केली असता त्याने सांगली जिल्हयातील त्याचे गावाकडील व परिसरातील साथीदारांसह कट करुन गुन्हा केल्याचे कबुल केले. तसेच गुन्हयातील मुख्य आरोपी हा चोरीस गेलेला मुददेमाल नागापुर एम.आय.डी.सी.अहमदनगर येथे विक्रीकरीता घेवुन जाणार होता असे सांगितले. त्याप्रमाणे लगेचच एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन अहमदनगर येथे कळवुन त्यांची मदत घेतली. त्यांनी एम.आय.डी.सी. मधील संबंधीत कंपनीत जावुन खात्री केली असता गुन्हयातील 4 आरोपी हे चोरीस गेलेल्या मुददेमालापैकी काही 1 टन माल संबंधीत कंपनीत विक्री करुन गेल्याचे समजले. ताब्यात असलेल्या संशयीताकडे अधिक विचारपुस केली असता त्याने बाकीचे आरोपी सांगली जिल्हयात त्यांच्या गावी गेल्याचे सांगितले. त्याप्रमाणे तयार करण्यात आलेल्या तपास पथकांमधील मनुष्यबळाचे योग्य नियोजन करुन अहमदनगर येथुन 4, तसेच सांगली जिल्हयातील कवलापुर, कुपवाड, मिरज व कवठेमहंकाळ अशा वेगवेगळया ठिकाणाहुन 6 आरोपींना ताब्यात घेण्यास तसेच गुन्हयातील चोरीस गेलेला 6 लाख रुपये किमतीचा मालट्रक, 8 लाख 50 हजार रुपये किमतीचे 7 टन वजनाचे करारो इंडीया या कंपनीचे लोखंडी कास्टींगचे जॉब तसेच 7 हजार 800 रुपये किमतीचे 2 मोबाईल हॅण्डसेट असा एकुण 14 लाख 59 हजार 300 रुपये किमतीचा संपूर्ण मुददेमाल हस्तगत करण्यात तपास पथकांना यश आले आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल व अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सुचनांप्रमाणे तसेच फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, फलटण शहरचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन रावळ, लोणंद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख व स्थानिक गुन्हे शाखेचे पो.ना.शरद बेबले, नितीन गोगावले, गणेश कापरे, प्रविण फडतरे, निलेश काटकर, विक्रम पिसाळ, रोहित निकम, लोणंद पोलीस ठाणेचे पो.हवा. महेश सपकाळ, अविनाश नलवडे, पो.ना. संतोष नाळे, ज्ञानेश्वर साबळे, पो.कॉ. अभिजीत घनवट, विठ्ठल काळे, श्रीनाथ कदम, अमोल पवार, सागर धेंडे, केतन लाळगे, ङ्गलटण शहर पोलीस ठाण्याचे पो.ना. नितीन चतुने, सर्जेराव सुळ, सुजित मंगावडे, दिग्विजय सांडगे, फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे पो.ना. देवा तुपे, महेश जगदाळे, सचिन पाटोळे यांनी सदरची कारवाई केलेली आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |