09:26pm | Sep 23, 2021 |
चाफळ : सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या खुनी थरारनाट्यामुळे चाफळ परिसरात तणाव निर्माण झाला आहे. चैतन्या बाळू बंडलकर (वय १८) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे, तर अनिकेत मोरे (वय २२, रा. शिंरबे, ता. कोरेगाव) असे खून करणाऱ्या युवकाचे नाव आहे.
खुनानंतर अनिकेत पोलिसांत जाऊन हजर झाला. त्याने गुन्हाही कबूल केल्यानंतर पोलिसांची धावपळ उडाली. मल्हारपेठ पोलिस घटनास्थळी पोहोचले असून कराडचे पोलिस उपाधीक्षक रणजीत पाटील घटनास्थळी दाखल झाले आहेत. खून झालेली चैतन्या व संशयित अनिकेत दोघेही कोरेगाव तालुक्यातील आहेत. चैतन्याचे मूळगाव वाठार किरोली, तर संशयित अनिकेतचे गाव शिरंबे (ता. कोरेगाव) आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चैतन्या हिची आई जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहे. काही दिवसांपूर्वी चाफळनजीकच्या चाहुरवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेत बदली झाली होती. त्यामुळे त्या मुलीसह चाफळला राहतात. संशयित अनिकेत व चैतन्या एकाच तालुक्यातील असल्याने त्यांचा परिचय होता. त्यात अनिकेतचे चैतन्यावर एकतर्फी प्रेमही होते. त्यातून तो तीला भेटायला येत होता. अनिकेतने मागील काही दिवसापूर्वी चैतन्याच्या आईची भेट घेवून चैतन्याबाबत लग्नास मागणी केली होती. अनिकेत मजुरीवर शेतातील कामे करतो.
अनिकेत आजही चाफळला दुचाकीवरून आला होता. येथील स्वागत कमानीजवळ तो चैतन्याला भेटला. त्यांच्यात काही बेलणे होण्यापूर्वीच त्याने तीचा तोंड दाबून त्याच्याकडे असलेल्या चाकूने तीचा गळा चिरला. त्यात ती जागीच ठार झाली. सकाळी दहाच्या सुमारास थरारनाट्य घडले. त्यामुळे ग्रामस्थांत धावपळ उडाली. भर चौकात झालेल्या थरार नाट्यामुळे ग्रामस्थांत घबराट पसरलीय. खुनानंतर सशयित अनिकेत पोलिसांत हजर झाला आहे. त्यावेळी पोलिसांना खुनाची माहिती समजली. त्यांचीही धावपळ उडाली. त्वरित त्याची माहिती वरिष्ठांना कळविण्यात आली असून कराडचे पोलिस उपअधीक्षक रणजीत पाटील, पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, मल्हारपेठचे फौजदार अजित पाटील, संतोष पवार घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी पंचानामा केला.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |