12:13pm | Jul 30, 2020 |
सातारा: सातारा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नॉलेज रिसोर्स सेंटर यांच्यावतीने घेण्यात आलेली महाराष्ट्रातील पहिली राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा अत्यंत उत्साहात नुकतीच पार पडली. पंधरा ते वीस वयोगाटातील मुलांमुलीसाठी ही स्पर्धा आयोजित केलेली होती. या स्पर्धेत पहिला क्रमांक नाशिक येथील दर्शन गायकवाड या मुलाने पटकावला.
या स्पर्धेला महाराष्ट्र, गुजरात, गोवा, बेळगांव आदी भागातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध विषयावरील लिखित स्वरूपाचे भाषणांसह स्पर्धकांनी अर्ज केले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर नॉलेज रिसोर्स सेंटरच्या निवड समितीनी या सर्व भाषणांचा अभ्यास करून आणि अर्जांची छाननी करून अत्यंत दर्जेदार असणार्या 9 भाषणांची अंतिम स्पर्धेसाठी निवड केली. या 9 स्पर्धकांची भाषणे ऑनलाईन झाली. प्रत्येक स्पर्धकाला एका मर्यादित वेळेत आपले भाषण दर्शकांसमोर मांडणं बंधनकारक होते, असे असताना 9 स्पर्धकांनी आपला परफॉर्म चांगला दाखवला. यामध्ये आयआयटी, रोहतकमध्ये शिकत असलेल्या नाशिकच्या दर्शन गायकवाड याने प्रथम क्रमांक पटकावला. ‘समतेकडून जातीअंताकडे’ या विषयावर केलेल्या त्याच्या भाषणाने दर्शकांची मने जिंकून घेतली. द्वितीय क्रमांक धुळे येथील प्रफुल्ल माळी याने हासील केला तर तृतीय क्रमांकावर पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातील जान्हवी शेलार आणि सातारा वडूज येथील रविना यादव यांनी आपल्या वक्तृत्वाची मोहर उमटवली.
परिक्षक म्हणून प्राचार्य डॉ.अरुण गाडे, डॉ.प्रमोद फरांदे, सुदर्शन इंगळे यांनी काम पाहिले. या स्पर्धेपाठीमागचा उद्देश डॉ.बाबासाहेब आंबेडकर नॉलेज रिसोर्सचे प्रमुख मिलिंद कांबळे यांनी सविस्तरपणे स्पष्ट केला. डॉ. अमोल खोबरागडे यांनी स्पर्धेचे उत्तमरित्या नेटके संचलन केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सेंटरचे किरण कांबळे, विजय भंडारे, योगेश म्हस्के, संकेत म्हस्के, प्रज्वल मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
विजेत्या स्पर्धकांची भाषणे अश्वघोष थिएटर या यूट्यूब चनेलसह फेसबुकवरही दर्शकांना पाहण्यासाठी उपलब्ध केली आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख रक्कम तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. पहिल्या क्रमांकाचे बक्षिस शिवराय फुशांबू ब्रिगेडचे चंद्रकांत फडतरे यांनी प्रायोजित केले होते. दरम्यान लॉकडाउनच्या काळात मुलांना स्पर्धैच्या माध्यमातून अत्यंत चांगले विचारमंच उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्राभरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज रिसोर्स सेंटरचे अभिनंदन होत आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |