फलटण: मुस्लिम समाजाचे विविध प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असून त्याची सोडवणूक त्वरित व्हावी, अशी मागणी मुस्लिम समाजातील विविध संघटनांच्यावतीने मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली असून यासंबंधीचे निवेदन फलटणचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांना मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुस्लिम समाजातील विविध संघटनांच्या वतीने पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अल्पसंख्याक मंत्रालयाचे वार्षिक बजेट किमान 2000 कोटी रुपये करावे, प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक विकास संचालक या पदावर उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी नियुक्त करावेत, अल्पसंख्याक समाजातील सामाजिक संस्थाना अल्पसंख्याक दर्जा देऊन शासन योजना तळागळातील गरजू पर्यंत पोचविण्यासाठी या संस्थांना विकास प्रक्रियेत सामील करावे, राज्य व जिल्हावार विकास प्रक्रिया व जिल्हा अग्रणी बँकेच्या वार्षिक वित्तपुरवठा आराखड्यामध्ये प्राधान्याने लक्ष देऊन 15 टक्के वित्तपुरवठा होण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी व यासाठी जिल्हा वित्त नियोजन कमिटीमध्ये अल्पसंख्याक सामाजिक संस्थाना प्रतिनिधी नियुक्त करावेत.
अल्पसंख्याक विकास योजना जनजागृतीसाठी व पंतप्रधान 15 कलमी कार्यक्रम प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्हाधिकारी यांना किमान 10 लाख रुपये निधी देण्यात यावा, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा अल्पसंख्याक विकास संनियंत्रण समिती नवीन शासन निर्णय आल्यानंतर तातडीने स्थापन कराव्यात, वक्फ महामंडळाला आयएस, आयपीएस मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करावेत, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुस्लिमांना सरसकट शैक्षणिक आरक्षण देण्यात यावे, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या असून सदरचे निवेदन प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव यांना देण्यात आले. तत्पूर्वी मुस्लिम समाजाचा जनजागृती मेळावा पार पडला. यावेळी महाराष्ट्र मायनॉरिटी एनजीओ फोरमचे अध्यक्ष जाकीरभाई शिकलगार, मुस्लिम ऑल इंडिया ओबीसी संघटनेचे अध्यक्ष सादिकभाई शेख, हाजी गुलाब शेख, हाजी निजामभाई आतार, अब्दुलभाई सुतार, एडवोकेट समीर इनामदार, अश्फाक खान, जमशेद पठाण, जावेद शेख सादिक बागवान, अल्ताफ पठाण अजीजभाई शेख, सैफुल्ला शेख, पप्पूभाई शेख, नगरसेवक बाळासाहेब मेटकरी, समीर तांबोळी ,आयाज आतार ,रशीद भाई तांबोळी, नजीरभाई शेख, रुकमोद्दीन नदाफ, डॉ.लतीफ आतार, नसीर शिकलगार आदी उपस्थित होते.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |