मुंबई : पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे. अविनाश भोसले यांची यापूर्वी ईडी आणि सीबीआयनं चौकशी केली होती. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीएचएफल प्रकरणात अविनाश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सीबीआयकडून अविनाश भोसले यांचा शोध सुरु होता.
ईडीनं यापूर्वी फेमा कायद्यांअंतर्गत अविनाश भोसले यांची चौकशी केली होती. सीबीआयनं गेल्या काही दिवासांपूर्वी भोसले यांच्या घरी छापे टाकले होते. अविनाश भोसले यांना अटक केल्यानंतर सीबीआय नेमकी काय कारवाई करणार येणाऱ्या काळात समोर येईल. ईडीनं गेल्यावर्षी अविनाश भोसले यांची संपत्ती जप्त केली होती. डीएचएफएल प्रकरणात सीबीआयकडून त्यांचा शोध घेण्यात आला होता.
अविनाश भोसले यांच्यावर ईडीनं गेल्यावर्षी कारवाई केली होती. अविनाश भोसले यांची ४० कोटींची संपत्ती गेल्यावर्षी जूनमध्ये जप्त करण्यात आली होती. अविनाश भोसले यांच्या व्यावसायिक भागीदारांवर देखील छापे टाकण्यात आले होते. डीएचएफएल येस बँक लोन प्रकरणी अविनाश भोसले यांच्यावर सीबीआयनं ही कारवाई केली आहे. सीबीआयनं अटकेची कारवाई करण्यापूर्वी ३० एप्रिल रोजी छापे टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. अविनाश भोसले यांचे मित्र आणि व्यावसायिक भागीदार यांच्यावर देखील सीबीआयनं छापे टाकले होते. मुंबईतील मालाडमध्ये सीबीआयनं छापे टाकले होते, अशी माहिती आहे. सीबीआयनं ३० एप्रिलला ८ ठिकाणी छापे टाकले होते. अविनाश भोसले हे एबीआयल ग्रुपचे मालक आहेत.
अविनाश भोसले यांची बांधकाम व्यावसायिक म्हणून पुण्यासह राज्यातील विविध भागांत ओळख आहे. तसंच व्यवसायासोबतच राजकीय नेत्यांसोबतच्या संबंधांमुळेही भोसले चर्चेत असतात. काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे ते सासरे आहेत. मात्र भोसले यांचा सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांसोबत संपर्क असल्याचं बोललं जातं. गेल्या काही काळापासून ईडीने त्यांच्याविरोधात कारवाईचा धडाका सुरू केल्याने ते अडचणीत सापडले आहेत. याप्रकरणी आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |