03:10pm | May 13, 2022 |
लिंब : उच्चशिक्षित प्राध्यापकांची शैक्षणिक गुणवत्ता विद्यार्थ्यांच्या ज्ञान समृद्धी हा खऱ्या अर्थाने पूरक ठरते, असे मत व गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले. ते गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर लिंब येथे प्रा.धैर्येशील घाडगे यांनी औषध निर्माण शास्त्र शाखेतील जागतिक स्तरावरील ऐल्सवेअर पब्लिकेशनमध्ये विशेष पेपर प्रकाशत झाल्या बद्दल आयोजित केलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अजित कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ.योगेश गुरव,डॉ.संतोष बेल्हेकर, डॉ. भूषण पवार, डॉ. महेश थोरात, प्रा. सविञी पोळ, रजिस्टर निलेश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले, प्राध्यापक धैर्येशील घाडगे यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयाचा नावलौकिक त्यांनी उंचविला आहे व सकारात्मक ऊर्जेचा जोरावर त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.
प्राचार्य अजित कुलकर्णी म्हणाले औषध निर्माण शास्त्र काळानुसारअधिक प्रगल्भ व विकसित होत आहे नाविन्यपूर्ण संशोधन ही आजच्या काळाची खरी गरज आहे मानवी जीवनपद्धती व आजार यावर अधिक अधिक सूक्ष्म संशोधनबाबत शोध सुरू आहेत .प्रा.धैर्येशील घाडगे यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे यासाठी ते सातत्याने औषधनिर्माण-शास्त्र क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करीत आहेत त्यांनी याबाबत केलेले विशेष कार्याची दखल जागतिक स्तरावर घेतली आहे त्यामुळे महाविघालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
प्रा. धैर्येशील घाडगे म्हणाले की संशोधनात्मक कार्यासाठी सर्व घटकांचे अनमोल सहकार्य लाभले आहे भविष्याचा विचार करता मानवी जीवनाच्या आरोग्यविषयक गरजा व त्यावर प्रभावी उपचार पद्धती बाबतची मी केलेले संशोधनाची दखल जागतिक स्तरावर घेतल्याने मी केलेल्या परिश्रमाचे सार्थक झाले आहे. प्रास्तविक व सूत्रसंचालन संजय देशमाने यांनी केले
प्रा. धैर्यशील घाडगे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
जागतिक दर्जाच्या नामांकित एल्सवेअर (सायन्स ङिरेक्ट) या पब्लिकेशन हाऊसमधील जर्नल ऑफ ग ङिलिव्हरी सायन्स ॲन्ङ टेक्नॉलॉजी या नामाकित जर्नल मध्ये गौरीशंकर फार्मसी मध्ये कार्यरत असणारे प्रा.धैर्यशील घाडगे यांचा पेपर प्रकाशित झाला आहे ही महाविद्यालय त्यादृष्टीने गौरवास्पद बाब आहे. प्रकाशित झालेल्या जर्नल थॉमसन रूटर इॅम्पॅक्ट फॅक्टर 3.981 आहे. हे विशेष उल्लेखनीय बाब आहे संशोधनाचा विषय "फॉरम्युलेशन ऑप्टिमायझेशन ॲन्ङ इनव्हिट्रो इव्हालयुएशन ऑफ ॲनास्टोलझोल लोङेङ नॅनोस्टकचर्ङ लिपिङ कॅरिअर्स फॉर इम्र्पुव्ह ऑफ ॲटिकॅन्स ॲक्टिव्हीटी या विषयावर संशोधन केल्याने या क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे कर्करोगाविषयी अधिक सूक्ष्म संशोधन या माध्यमातून केली आहे त्यांचा जागतिक स्तरावर अनेक संशोधकांना संदर्भ म्हणून उपयुक्त ठरणार आहे
आता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी होणार |
साताऱ्यात पोलिसांवरच आंदोलन करण्याची वेळ |
अविनाश भोसलेंना अटक झाली; जिल्ह्यातील हस्तक अधिकार्यांना कधी? |
पुणे-महाबळेश्वर बसमध्ये सापडली बंदुकीची गोळी |
शाहूनगर येथे लोकवर्गणीतून बसवले जाणार सीसीटीव्ही कॅमेरे |
गोडोली जकात नाका परिसरातील हातगाडे पालिकेने केले जप्त |
रणसिंगवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण जाधव, व्हाईस चेअरमनपदी सुभद्रा पोतेकर बिनविरोध |
राजापूर सोसायटीच्या चेअरमनपदी जयवंतराव डंगारे, व्हाईस चेअरमनपदी दादा लवंगारे बिनविरोध |
गोळीबाराने हादरली अमेरिका ! |
सांगवी येथे जुगार अड्ड्यावर छापा : एकावर गुन्हा |
भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, विजय आमचाच होणार |
छत्रपतींचा सन्मान नव्हे, स्वपक्षाचा संकुचित विचार केला |
जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आवाहन |
पालखी मार्गावर १० जूनपर्यंत कामे पूर्ण करा |
केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईत हस्तक्षेप होता कामा नये |
गोडोली जकात नाका परिसरातील हातगाडे पालिकेने केले जप्त |
रणसिंगवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण जाधव, व्हाईस चेअरमनपदी सुभद्रा पोतेकर बिनविरोध |
राजापूर सोसायटीच्या चेअरमनपदी जयवंतराव डंगारे, व्हाईस चेअरमनपदी दादा लवंगारे बिनविरोध |
गोळीबाराने हादरली अमेरिका ! |
सांगवी येथे जुगार अड्ड्यावर छापा : एकावर गुन्हा |
भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, विजय आमचाच होणार |
छत्रपतींचा सन्मान नव्हे, स्वपक्षाचा संकुचित विचार केला |
जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आवाहन |
पालखी मार्गावर १० जूनपर्यंत कामे पूर्ण करा |
केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईत हस्तक्षेप होता कामा नये |
राज्यसभा निवडणुक : संभाजीराजे छत्रपती अर्जही भरणार नाहीत ? |
परबांसोबत शिवसेनेचे यशवंत जाधव अडचणीत |
गुणवंत विद्यार्थ्यांनी गौरीशंकरची शैक्षणिक प्रतिमा उंचविली : श्रीरंग काटेकर |
महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांची तब्बल २.४४ लाख पदे रिक्त |
रस्ता अडविल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा |