पुसेगाव: जांब (ता.खटाव) येथील राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष रामचंद्र शिंदे यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ आमदार शशिकांत शिंदे संचलित कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या गोरगरीब रुग्णांच्या उपचारार्थ 10 हजार रूपयांची मदत केली. दोन वर्षापूर्वी श्री. शिंदे यांच्या आईचे निधन झाले होते. तेव्हापासून त्यांच्या स्मरणार्थ ते धार्मिक कार्याचे आयोजन करत मात्र कोरोनामुळे त्यांनी या कार्यक्रमावर होणार्या खर्चाला फाटा देत तीच रक्कम सर्वसामान्यांच्या उपचारार्थ खर्च करण्याचा निर्णय घेऊन आमदार शिंदे यांच्याकडे रक्कम सुपूर्त केली.
याप्रसंगी आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, जिल्ह्यात कोराना बधितांच्यात होणार्या लक्षणीय वाढीमुळे सर्व रुग्णालये फुल्ल झाली आहेत. अशा परिस्थितीत गोरगरिब रुग्णांची प्रचंड परवड सुरू आहे. एकतर हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही. अशा परिस्थितीत कुटुंबातील एकादा सदस्य बाधित झाला तर त्या घर रसातळाला जाते. त्यामुळे अशा परिस्थितीत गोरगरीबांना मिळणारी मदत फार मोलाची आहे. रामभाऊ सारख्या दानशूर व्यक्तींच्या मदतीमुळे अनेक गोरगरीब रुग्णांना या महामारीत दिलासा मिळणार आहे. समाजातील उच्चस्तरातील व्यक्तींनी धार्मिक, शुभकार्यात होणार्या खर्चाला फाटा देत आपापल्या परीने गोरगरीबांना मदत करण्यासाठी पुढे यावे. या मदतीचे मोल कशातच करता येत नाही.
रामचंद्र शिंदे हे माजी सैनिक असून ते कायमच गावात सामाजिक कामात अग्रेसर राहून अनेक सामाजिक उपक्रम राबवत आले आहेत. गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, गोरगरीबांच्या आरोग्यासाठी मदतीचा हात पुढे करत आले आहेत. त्यांचा मुलगा सुरज हा देखील भारतीय सैन्य दलात असून सद्यस्थितीत तो येथे सेवा बजावत आहे. सुरजनेही आपल्या वडीलांचा आदर्श घेत आज्जीच्या पुण्यस्मरणार्थ तेथील खेड्यात जाऊन गोरगरीबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. देशावर येणार्या संकटात महाराष्ट्र सैनिक धावून जातोच आणि या महामारीच्या संकटातही जात असल्याचे पाहून अभिमानाने उर भरून येत असल्याची भावना आमदार शिंदे यांनी व्यक्त केली.
यावेळी आमदार शशिकांत शिंदे, ज्येष्ट नेते बाळासाहेब इंगळे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव, माजी सरपंच चंद्रकांत शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र कचरे, मधुकर ढाणे, आमलेवाडीचे माजी सरपंच हणमंत मोरे उपस्थित होते. खटाव तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष साळुंखे यांनी आभार मानले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |