02:27pm | Jun 12, 2021 |
वाई : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने वाई शहरातील प्रतिबंधित क्षेत्राच्या अटी व नियम शिथिल करण्याबाबत आमदार मकरंद पाटील यांच्या मध्यस्थीनंतर संपूर्ण शहराऐवजी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे प्रांताधिकार्यांनी सायंकाळी आदेश जारी केले.
यावेळी यशवंतनगर, पाचवड, भुईंज आणि लोणंद येथीलही प्रतिबंधित क्षेत्र शिथिल करावे, अशा सूचना आमदार पाटील यांनी प्रशासनास दिल्या. यापूर्वीच महाबळेश्वर, पाचगणी व शिरवळ येथील निर्बंध शिथील केले आहेत.
येथील विश्रामगृहात झालेल्या या बैठकीस प्रांताधिकारी संगीता राजापूरकर - चौगुले, तहसीलदार रणजित भोसले, पालिका मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ उपस्थित होत्या.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 27 एप्रिल पासून संपूर्ण वाई शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, आस्थापना बंद आहेत. शहरातील सर्व व्यवहार ठप्प असल्याने छोट्या - मोठ्या व्यापारी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. शहरातील कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याने प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्रातील अटी व नियम शिथिल कराव्यात, अशी मागणी व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी केली.
टाळेबंदीच्या काळात सर्व व्यवहार बंद असताना कोरोना रुग्ण आणि बाधितांची संख्या वाढत आहे. यांचाच अर्थ प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाने घातलेल्या निर्बंधाचे पालन अजूनही नागरिक करीत नाहीत. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्राचा निर्बंध उठविल्यानंतर संसर्ग वाढल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न स्थानिक प्रशासनाने उपस्थित केला. त्यावर कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी व्यवसाय करताना शासनाने ठरवून दिलेल्या वेळेचे, मुखपट्टीचा वापर व सामाजिक अंतर या नियमांचे काटेकोर पालन करण्याची, सर्व व्यापारी, कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्याची ग्वाही व्यापारी प्रतिनिधींनी दिली. यावेळी सचिन फरांदे, अशोक लोखंडे, हेमंत येवले, अजित वनारसे, भवरलाल ओसवाल, उमेश शहा यांनी व्यापार्यांची बाजू मांडली. यावेळी व्यापारी व काही पालिका पदाधिकारी उपस्थित होते.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |